India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुंबई सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले ५३८ कोटी रूपयांचे अमंली पदार्थ केले नष्ट

India Darpan by India Darpan
December 31, 2022
in राष्ट्रीय
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई सीमा शुल्क विभाग -3 च्या वतीने आज नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्‍ल्‍यूएमएल) च्या ज्वलन सुविधास्‍थानी 140.57 किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करण्‍यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 538 कोटी रूपये आहे. या संदर्भात जप्त करण्‍यात आलेल्‍या अंमली पदार्थांचा तपशील देताना, विभाग-3 चे मुख्‍य आयुक्त, राजेश सानन यांनी सांगितले की, नष्ट केलेली औषधे विभाग -3 अंतर्गत कार्यरत असलेल्‍या तीन आयुक्तालयांनी जप्त केली आहेत. जप्तीच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1. मुंबई विमानतळ आयुक्तालयाने 14 प्रकरणांमध्ये 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरस जप्त केला आहे.
2. एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात 21.70किलो चरस जप्त केले.
3. डीआरआयने एका प्रकरणात 29 किलो हेरॉईन जप्त केले, तर मुंबई सीमा शुल्क विभाग-3 च्या प्रतिबंधात्मक आयुक्तालयाने हा माल नष्‍ट केला.

सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार बंदी असलेले अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर परिणाम करणारे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती अवैध कृत्य करीत असल्याचे मानले जाते. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या कलम 8 अन्वये गुन्ह्यानुसार दोषी आहेत. तसेच या कायद्यातील कलम 21, कलम 23 आणि एनडीपीएस अधिनियम 1985 मधील कलम 29 नुसार शिक्षेस पात्र आहेत.

सीमा शुल्क अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अंमली पदार्थ जप्तीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की; अंमल पदार्थांची तस्करी प्रामुख्याने केनिया, युगांडा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांतील नागरिकांकडून केली जाते. सामानामध्ये खास यासाठी गुप्त कप्पे बनवून त्यामध्ये हे अंमली पदार्थ लपवून त्यांची तस्करी केली जाते. तसेच प्रवाशानेही अशा पदार्थाचे सेवन केलेले असते, असे आढळले आहे. मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने अंमली पदार्थांची होणारी अवैध वाहतूक शोधण्यासाठी ‘स्निफर डॉग’चा प्रभावीपणे वापर केला आहे.

जप्त केलेल्या अंमली पदार्थांना जाळून नष्‍ट करणे आवश्यक असले तरीही ते पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने हानीकारक आहे. त्यामुळे असे पदार्थ जाळून भस्मसात करण्‍यासाठी प्रमाणित प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवलेल्या ’इन्सिनरेटर्स’ मध्ये करणे आवश्यक आहे.


Previous Post

मकर राशीच्या व्यक्तींना असेल जाईल २०२३ हे वर्ष; घ्या जाणून सविस्तर

Next Post

चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेरला तीन सुवर्णपदक

Next Post

चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेरला तीन सुवर्णपदक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group