कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘गाव तिथे एसटी’ असे या महामंडळाचे ध्येय असले तरी अद्याप कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात अद्याप पर्यंत एसटी बस पोहोचलेला नाही. वास्तविक देशात यंदा सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील एक गाव एसटी बससेवेच्या प्रतिक्षेत आहे. या गावात एसटीची सेवा नक्की कधी मिळेल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असतानाच देशाने अनेक क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. 1947 भारत स्वातंत्र्य झाला आणि 1948 मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएसआरटीसी) कडून प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीलाच त्या काळात सार्वजनिक वाहतुकीचा अधिकार देण्यात आला, आणि 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर राज्यातील पहिली बस धावली.
महाराष्ट्राची राज्याच्या स्थापनेपाठोपाठ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा जन्म झाला. 1948 पासून ते अगदी आतापर्यंत एसटी महामंडळाकडून अहोरात्र सेवा दिली जात आहे.गाव तेथे एसटी आणि रस्ता तेथे एसटी असं ब्रीद घेऊन महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यापासून ते गावं वस्त्यापर्यंत एसटी पोहचली, मात्र एसटीच्या या प्रवासात आणि स्वातंत्र्य महोत्सवाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील काजिर्णे गावात मात्र कधीही बस आली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील आणि चंदगड तालुक्यातील काजिर्णे हे गाव हजार आणि दीड हजार वस्तीचं गाव. काजिर्णे आणि म्हाळुंगे अशी ग्रुप ग्रामपंचायत या गावाला आहे. चौथी पर्यंत शाळा आहे. चौथीनंतर मात्र आता हिंडगाव, चंदगड आणि नागनवाडीला येथील मुलं शाळेला जातात. एसटीची सेवा गाव तेथे एसटी आणि रस्ता तेथे एसटी अशी असली तरी काजिर्णे गावाला मात्र एसटी महामंडळाकडून ही सेवा देण्यात आली नाही. या गावाला जाण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर धावणाऱ्या बस काजिर्णे गावाच्या फाट्यावरुन जातात, फाट्यावरुन गावामध्ये चालतच जावे लागते.
राज्यातील पहिली एसटी बस १९४८ मध्ये नगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. त्यानंतर कालानुरूप एसटी महामंडळाकडून प्रवासीवाढीसह विविध विषयांबाबत अनेक योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, असे असले तरी यामध्ये आता नगरचा विचार क्वचितच होतो. आता बदलत्या काळात प्रवासाची अनेक साधने आहेत. पण बदलत्या काळात महामंडळही बदलले आहे. साधी लाकडी बस जाऊन त्यानंतर मिडी बस, निमआराम बस, शिवनेरी बस, शिवशाही बस अशा बस महामंडळाच्या ताफ्यात आल्या.
महामंडळात एक लाख कर्मचारी आहेत. महामंडळाच्या सतरा हजार बसमधून रोज सत्तर लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. आज महामंडळाचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात झाला आहे. ज्या गावात रस्ता नाही अगदी अशा गावातही एसटी जाते. महामंडळ तोट्यात असतानाही प्रवाशांची गैरसोय नको म्हणून काही ठिकाणी बससेवा सुरू आहे. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत एसटीचे अस्तित्व हरवत चालले आहे. हक्काचा प्रवासी दूर जात आहे. तोटा वाढत चालला आहे.
बेळगाव-सावंतवाडी या राज्य महामार्गापासून काजिर्णे गाव चार ते पाच किलो मीटर आता आहे. गावातून बाहेर जाण्यासाठी किंवा मुलांना शाळेला जाताना नेहमी बससाठी चार ते पाच किलो मीटर चालत हिंडगाव फाट्यावर येऊनच बस पकडावी लागते. शाळेला जाणाऱ्या आणि शाळेतून येणाऱ्या मुलांसाठी सायंकाळ झाल्यावरही याच रस्त्याने चालत घरी परतावे लागते. काजिर्णे गावाजवळ डोंगर असल्याने या परिसरात नेहमीच गव्या रेडा, डुक्कर आणि सुगीच्या दिवसात हत्तींचाही वावर असतो. या परिस्थितीही येथील नागरिकांनी नेहमीच बससाठी चार ते पाच किलोमीटर चालत येऊन हिंडगाव फाट्यावर बस मिळवावी लागत आहे.
काजिर्णे गावात गेल्या कित्येक वर्षांपासून बस सुरु का करण्यात आली नाही याबाबत माहिती देताना अधिकारीवर्गानी सांगितले की, त्यासाठी ग्रामपंचायतीकडून मागणी, त्याप्रकारचा ठराव येणेही गरजेचे असते मात्र त्याप्रकारचा ठराव काजिर्णे-म्हाळुंगे ग्रुप ग्रामपंचायतीकडून कधी आलाच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने एवढ्या वर्षात एकदाही काजिर्णे गावामध्ये बस सुरू व्हावी म्हणून ठराव कधी दिला नाही. त्यामुळेच गेल्या 75 वर्षामध्ये अजून एकदाही गावात बस आली नाही. काजिर्णे गावामध्ये ज्याप्रमाणे कधीच बस आली नाही त्याच प्रमाणे अजूनही गावामध्ये अनेक मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
MSRTC ST BUS Service not Provided in this Village
Maharashtra Kolhapur Kajirne Village Transport