शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘नासा’ला मंगळावर सापडले हे अनोखे खनिज; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 5:15 am
in राष्ट्रीय
0
Capture 46

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मंगळ ग्रहावर सात वर्षांपूर्वी एक गूढ चांदीसारखे ट्रायडिमाइट खनिज हाती लागले होते. या खनिज धातूच्या शोधामुळे वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले होते. हा धातू मंगळ ग्रहावर कसा तयार झाला, असा प्रश्न अनेक संशोधकांच्या मनातही रेंगाळत होता. आता या धातूविषयी अनेक वेगवेगळ्या बाबी समोर येत आहे.

मंगळावरील गेल क्रेटरमध्ये ट्रायडिमाइटचा शोध आश्चर्यजनक असल्याचे मत नासातील मिशनच्या विशेषज्ञांनी व्यक्त केले आहे. मागील दहा वर्षांतील हा सर्वाधिक आश्चर्यजनक शोध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारण मंगळावर होत असलेल्या ज्वालामुखीतून ट्रायडीमाईटसारखी सिलिकायुक्त खनिजे होऊ शकत नाहीत, हे ज्वालामुखी उपयुक्त नाहीत असे मानण्यात येत होते. तसेच गेल क्रेटर हा भाग जुना तलाव असल्याचे मत वैज्ञानिकांचे होते. त्याच्या आसपास कोणताही ज्वालामुखी नसेल असे त्यांना वाटत होते.

संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार हे खनिज निर्माण कसे झाले, याचे रहस्य त्यांनी शोधून काढलेले आहे. पृथ्वीवार सामान्यपणे सापडणारा हे खनिज मंगळ ग्रहावर, ३ अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या एका ज्वालामुखीच्या स्फोटात बाहेर आले होते, असा संशोधकांचा दावा आहे. नासाच्या क्युरियोसिटी रोव्हरने ३० जुलै २०१५ रोजी १५४ किलोमीटर गेल क्रेटरवर एका मोठ्या खडकाच्या आत हे खनिज शोधून काढले होते. या रोव्हरने या मोठ्या खडकावर, छोटे छिद्र केले होते. याच्यातून चांदीसारखा दिसणारे एक खनिज बाहेर आले होते.

क्युरि्योसिटीत असलेल्या एक्स रे प्रयोगशाळेनत हा धातू ट्रायडीमाईट असल्याचे सिद्ध झाले होते. हे खनिज – धातू पूर्णपणे सिलिकॉन डाय ऑक्साईड पासून तयार होतो. काही ज्वालामुखींच्या उद्रेकावेळी हा धातू तयार होतो. मंगळावर अशा प्रकारचा एखादा शोध लागेल, याची कल्पनाच संशोधकांनी केली नव्हती.

या अज्ञात ज्वालामुखीच्या स्फोटानंतर, ट्रायडीमाईटची राख मंगळावरील आकाशात उडाली असेल. त्यानंतर ती राख गेल क्रेटरच्या प्राचीन तलावात पडली असेल. ट्रायडीमाईट पाण्यात पडल्यानंतर, रासायनिक प्रक्रिया होऊन ते वेगवेगळ्या तुकड्यात विभागले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ट्रायडीमाईटचे सँपल्स एवढे शुद्ध स्वरुपात मिळालेले आहेत. जर पाणी नसते तर या धातूचा सलग तुकडा मिळाला असता, असे संशोधकांना वाटते आहे.

वैज्ञानिक मंगळावरील ज्वालामुखीच्या काळाचा अंदाजही बांधत आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की हे क्रेटर ३ ते ३.५ अब्ज वर्षांपूर्वी पाण्याने भरलेले होते. जर त्यात ट्रायडीमाईट पडले असेल तर साधारण तितक्याच वर्षांपूर्वी या ज्वालामुखीचा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गर्लफ्रेंड जाड्या म्हणाली…. पठ्ठ्यानं वर्षभरात चक्क ७० किलो वजन घटवलं… (व्हिडिओ)

Next Post

हो, या गावाला अजूनही आहे एसटी बसची अपेक्षा; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही दुर्लक्षितच

Next Post
city bus e1631185038344

हो, या गावाला अजूनही आहे एसटी बसची अपेक्षा; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही दुर्लक्षितच

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011