इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मिडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो आहे लग्नातला. या व्हिडिओतील नवरदेव हा महावितरणचा कर्मचारी आहे. म्हणजेच, लग्नाच्या धामधुमीत त्याने एक उखाणा घेतला आहे. आणि त्याचा हा व्हिडिओ आहे. त्याच्या या भन्नाट उखाण्याने शुभकार्यातही जनजागृतीचे कार्य केले आहे.
नांदगाव येथे महावितरणमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर यांचा शुभविवाह नुकताच झाला. या सोहळ्यात त्यांनी नववधूसोबत एक उखाणा घेतला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात अनेकांच्या पसंतीस उरला आहे. बघा, त्यांनी असा काय उखाणा घेतला ज्याची सध्या चर्चा होते आहे, व्हिडिओ
https://twitter.com/MSEDCL/status/1629061830961414144?s=20
MSEDCL Employee Wedding UKhana Video Viral