मुंबई – एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा आता ४ सप्टेंबर रोजी होणार असून त्याचे परिपत्रक आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढले आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी ही परीक्षा घेतली जणार आहे. ही परीक्षा अगोदर ११ एप्रिल रोजी होणार होती. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती पुढे ढकलण्यात आली. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ३ ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणारे पत्र प्राप्त झाल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोगाने केेल आहे.