– राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 48 कोटी 52 लाख मात्रा देण्यात आल्या
– महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात एकूण 3,09,33,022 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
– रोगमुक्तीचा दर सध्या 97.37% आहे
– गेल्या 24 तासांत 36,668 कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले
– भारतात गेल्या 24 तासांत 42,625 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली.
– देशात सध्या 4,10,353 कोविड सक्रीय रुग्ण आहेत
– सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.29% आहे
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 5% पेक्षा कमीच राहिला असून सध्या हा दर 2.36% आहे
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.31% इतका असून तो 5% पेक्षा कमीच राहिला आहे.
– कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्या करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ – आतापर्यंत एकूण 47 कोटी 31 लाख चाचण्या करण्यात आल्या.