इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील सोहागी डोंगरावर रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात झाला आहे. ३ वाहनांच्या भीषण अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर ४० जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश सीमेला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा अपघात झाला. हे सर्व मजूर दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जात होते.
घटनेची माहिती मिळताच सोहागी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी बचाव मोहीम राबवून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्यांना तूंतर सिव्हिल हॉस्पिटल तसेच रीवा येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये आणि जखमींना मध्य प्रदेश सरकारकडून १० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
ही संपूर्ण घटना शुक्रवारी मध्यरात्रीची आहे. बस जबलपूरहून रेवामार्गे प्रयागराजला जात होती. दिवाळी साजरी करण्यासाठी सिकंदराबादहून या बसमध्ये प्रवासी लखनौमध्ये त्यांच्या घरी जात होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पहिली प्रवासी बस कटनीला पोहोचली. कटनी ते लखनौ या बसमध्ये अधिक प्रवासी भरले होते. यानंतर ही बस प्रवाशांसह उत्तर प्रदेशातील लखनौला रवाना झाली. बस रेवाच्या सोहागी डोंगरावर येताच तिचे नियंत्रण सुटले आणि ती ट्रकला धडकली. ट्रक विटांनी भरलेला होता. धडक होताच बस पलटी झाली. यादरम्यान बसच्या बोनेटवर आणि पुढील सीटवर बसलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
बसमध्ये १०० हून अधिक प्रवासी
बसमध्ये १०० हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. प्रत्यक्षात बस सोहागी डोंगराजवळ येताच बसच्या पुढे जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिली. यादरम्यान बस अनियंत्रित होऊन ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन पलटी झाली. ट्रकला धडकलेल्या वाहनाचा चालक वाहनासह घटनास्थळावरून बेपत्ता आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधील रहिवासी आहेत. प्रशासकीय पथक त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासाठी त्यांचा शोध घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य हाती घेतले. जिल्हाधिकारी मनोज पुष्प, एसपी नवनीत भसीन यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रात्री उशिरा रीवा जिल्ह्यात झालेल्या रस्ता अपघातावर शोक व्यक्त केला आहे. चौहान यांनी शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे पार्थिव अजूनही मंदिरात ठेवण्यात आले आहे, ते मध्य प्रदेश सरकार आदरपूर्वक प्रयागराज येथे आणतील. यासोबतच जे सुरक्षित आहेत किंवा कमी जखमी आहेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून रात्रीच दोन बसमधून प्रयागराजला पाठवण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांवर रीवा मेडिकल कॉलेजमध्ये मोफत उपचार करण्यात येत आहेत.
मध्यप्रदेश के शाजापुर में सड़क दुर्घटना का दु:खद समाचार प्राप्त हुआ है। मैं घायलों के सकुशल होने तथा शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूं।
परमात्मा से दिवंगत आत्माओं को अपने श्रीचरणों में स्थान देने की प्रार्थना करता हूं।
।। ॐ शांति ।।
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) October 22, 2022
MP Travel Bus Major Road Accident 15 Death 40 Injured