मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि हुशारीने काही स्त्री – पुरुष मोठ मोठ्या पदांवर पोहोचतात, परंतु काहीजण नशिबाने उच्च पदावर जातात, असे म्हटले जाते. राजकारणात देखील असेच घडते. असा आजवरचा अनुभव आहे. भारतीय राजकारणाचा विचार केला असता अनेकांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली त्यापैकी बहुतांश जण ही नशिबाने पंतप्रधान झाले असे म्हटले जाते. याउलट अनेक जण त्या पदाला लायक असताना तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत, असे देखील म्हटले जाते.
सध्याच्या भारतीय राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजेच शरद पवार होय. सुमारे अर्धशतकापेक्षा जास्त काळ राजकारणात असलेले कदाचित ते भारतातील अगदी थोड्याच व्यक्तींपैकी एक असावेत, तरीही इतकेच नव्हे तर कमी वयात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, चार वेळा त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली इतकेच नव्हे तर देशाच्या राजकारणात संरक्षण मंत्री कृषी मंत्री यासारखी पदे देखील त्यांना मिळाली. मात्र ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत तरीही त्यांना अनेक जण पदावर नसलेले पंतप्रधान म्हणतात काँग्रेसमध्ये राहिले असते, तर ते निश्चितच पंतप्रधान झाले असते असे अद्यापही अनेकांचे मत आहे. इतकेच नव्हे तर खुद्द त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी असे मत व्यक्त केले आहे
राज्यात आणि केंद्रात समृद्ध राजकीय प्रवास करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदानं आजवर हुलकावणी दिली आहे. शरद पवार अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. कारण पवारांचा राजकीय संघर्ष अजूनही संपलेला नाही. पण शरद पवार जर काँग्रेसमध्ये असते तर ते आतापर्यंत पंतप्रधान झाले असते असं खुद्द सुप्रिया सुळे यांना वाटतं. ‘झी मराठी’वरील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे.
आता घरात पवार विरुद्ध शिंदे होणार.
नवा कार्यक्रम 'बस बाई बस'
आज, रात्री ९.३० वा. #BusBaiBus #ZeeMarathi pic.twitter.com/ARgXLt1kxH— Zee Marathi (@zeemarathi) July 29, 2022
आजपासून झी मराठीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक आणि अभिनेता सुबोध भावे यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध महिला सेलिब्रिटींशी मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा मारल्या जाणार आहेत.
सुप्रिया सुळे यांना यावेळी सुबोध भावे यांनी शरद पवार काँग्रेसमध्ये असते तर पंतप्रधान झाले असते असं वाटतं का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळे दोन पर्याय देण्यात आले होते. कधीच नाही किंवा कधीकधी यापैकी एक पर्याय सुप्रिया सुळे यांना निवडायचा होता. सुप्रिया सुळे यांनी कधीकधी नावाची पाटी दाखवत सहमती दर्शवली.
सुप्रिया ताईंनी मोदीजीं सोबतच्या सांगितल्या जुन्या आठवणी. @supriya_sule @SubodhBhave
नवा कार्यक्रम 'बस बाई बस'
आज, रात्री ९.३० वा. #BusBaiBus #ZeeMarathi pic.twitter.com/uAidRjj5kb— Zee Marathi (@zeemarathi) July 29, 2022
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, कधीकधी असं वाटतं. पण पदाला त्यांनी कधीच महत्व दिलं नाही. कामाला महत्व दिलं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी दिलखुलासपणे विविध प्रश्नांना उत्तरं दिली. तसेच छान वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमात त्यांनी काही किस्सेही सांगितले. जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शपथ घेतली, त्यावेळी तुमच्या घरातील वातावरण कसे होते? त्यावर सुप्रिया सुळे यांनी अतिशय मजेशीर पणे उत्तर दिले की, त्यावेळी मी झोपेत होते. तसंच सुप्रिया सुळे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले.
सुप्रिया ताईंच्या बस बाई बसच्या सेटवर महिलांसोबत दिलखुलास गप्पा.@supriya_sule @SubodhBhave
नवा कार्यक्रम 'बस बाई बस'
आज, रात्री ९.३० वा. #BusBaiBus #ZeeMarathi pic.twitter.com/y3nC58lbSg— Zee Marathi (@zeemarathi) July 29, 2022
MP Supriya Sule on Sharad Pawar Prime Minister ship NCP Zee Marathi Bus Bai Bus