मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विविध मतमतांतरेही व्यक्त होत आहेत. त्यात आता खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. राऊत म्हणाले की, भाकरी फिरवण्याचे संकेत होते पण तवाच फिरवला. त्यांच्या या ट्विटची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.
राऊत यांनी आणखी एक ट्विट करीत म्हटले आहे की, एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत.
भाकरी फिरवण्याचे संकेत होते..पण तवाच फिरवला.. pic.twitter.com/kkWDG2I15s
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2023
MP Sanjay Raut on Sharad Pawar Decision Politics