नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – शिवसेना नेते खा.संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर त्याचे पडसाद आता नाशिकला उमटले आहे. शालीमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करुन घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थितीत होते. ईडीने राऊत यांच्या घरावर धाड टाकल्यापासून मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर आले. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. आजही राज्यभर हे आंदोलन सुरु असून नाशिकमध्ये सुध्दा त्याचे पडसाद उमटले आहे. या आंदोलनात शिवसेना नेते सुनील बागुल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, सचिन मराठे यांच्यासह शिवसेनेचे नेते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.