नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने क्रेडाई नाशिक मेट्रो आणि प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (PRAN) यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या सहकार्याचा उद्देश दोन्ही संघटनांमध्ये सशक्त व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे आणि शास्त्रीय पद्धतीने व्यवसायवृद्धिंगत करणे तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शना द्वारे ज्ञानवृद्धी करणे आहे.
या कराराच्या माध्यमातून क्रेडाई आणि प्राण सदस्यांसाठी व्यावसायिक वाढीच्या संधी निर्माण केल्या जातील. क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष कृणाल पाटील आणि प्राण अध्यक्ष विक्रांत आव्हाड यांनी या सहकार्याचे महत्त्व स्पष्ट करताना चॅनेल पार्टनर मॉडेलद्वारे विक्री वाढवण्यावर भर दिला.
क्रेडाई सचिव गौरव ठक्कर आणि प्राण सचिव नितीन कोटकर यांनी नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित काम करण्याच्या संकल्पनेवर भर दिला. या उपक्रमामुळे विकसक आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांना अधिक पारदर्शक आणि संघटित पद्धतीने काम करता येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान क्रेडाई अध्यक्ष कृणाल पाटील यांनी प्राण सदस्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करत विक्री वाढीस चालना देण्याचा संदेश दिला, तर प्राण अध्यक्ष विक्रांत आव्हाड यांनी क्रेडाईच्या या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
स्वागत सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी केले.
या ऐतिहासिक कराराच्या वेळी क्रेडाई नाशिक मेट्रोचे सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड ऋषिकेश कोते, खजिनदार हितेश पोतदार तसेच क्रेडाई मुख्य कार्यकारी मंडळाचे सदस्य मनोज खिवसरा, अंजन भालोदिया, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, शाम साबळे, निशित अटल, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सुशील बागड, निरंजन शहा, सुशांत गांगुर्डे उपस्थित होते. प्राणतर्फे खजिनदार कैलास कदम, उपाध्यक्ष प्रदीप रणधीर , सहसचिव राज तलरेजा, सल्लागर राजेंद्र कोतकर, डी.जे धामणे तसेच प्राण समिती सदस्य अमित वाघ, यश शाह, संजय दुसे, श्रीकांत पाटेकर, क्षितिज दंडगवल, निलेश येवले, पवन राठी, श्रीरंग भदाणे, जगदीश बंग, गिरीश विजन, योगेश नेरकर, रवी सूर्यवंशी आणि इतर मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
हा सामंजस्य करार नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला चालना देईल तसेच व्यावसायिकता, ज्ञानवृद्धी आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण होण्यास मदत करेल.