विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार डॉ. भारती पवार यांनी आज सकाळी स्विकारला आहे. काल सायंकाळी राष्ट्रपती भवनात शपथविधी झाल्यानंतर आज सकाळीसच त्यांनी त्यांच्या नव्या कारकिर्दीला प्रारंभ केला आहे. आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, मंत्रालयाच्या विविध कामकाजाबद्दल त्यांना अवगत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्रिमंडळाची आज बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी डॉ. पवार यांनी पदभार स्विकारुन आपल्या मंत्रालयाच्या कारभाराची माहिती जाणून घेतली आहे. दुपारच्या सुमारास मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.