रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खळबळजनक! घरात घुसून राष्ट्राध्यक्षांवर गोळ्या झाडल्या; देशभरात संतापाचा उद्रेक

by India Darpan
जुलै 8, 2021 | 6:08 am
in संमिश्र वार्ता
0
E5tN6P3VkAcjys9

नवी दिल्ली – कॅरेबियाई देशांपैकी एक असलेल्या हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनल मोइस यांची काही गुंडांनी घरात घुसून हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. अंतरिम पंतप्रधान क्लाउडी जोसेफ यांनी जोवेनल मोइस यांच्या हत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या घरात घुसून काही गुंडांनी बुधवारी (७ जुलै) त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी आणि देशाच्या पहिल्या महिलासुद्धा जखमी झाल्या आहेत.
राष्ट्राध्यक्ष जोवेनल मोइस यांच्या खासगी निवासस्थानी जाऊन काही अज्ञान लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. एका कमांडोच्या गटाने ही हत्या घडवून आणल्याचे बोलले जात आहे. संशयितांकडे परदेशी शस्त्र होती.
मोइस यांची हत्या अमानवीय आणि निर्घृण असल्याचे सांगत अंतरिम पंतप्रधान क्लाउडी जोसेफ यांनी कठोर शब्दात निंदा केली आहे. लोकांनी संयम बाळगावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, या घटनेने देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, काही लोक सरकार उखडून टाकण्याचे तसेच आपली हत्या करण्याचे प्रयत्न करत असल्याची शंका राष्ट्राध्यक्ष जोवेनल मोइस यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. असा संशय असणार्या काही संशयितांना फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये हा कट रचण्यात आल्याचा दावा मोइस यांनी त्या वेळी केला होता. अटक झालेल्यांमध्ये एक न्यायाधीश आणि एक पोलिस महानिरीक्षक असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु हत्या होण्याच्या शंकेचे पुरावे किंवा संपूर्ण माहिती त्यांनी समोर ठेवले नव्हते.

Haiti's President Moïse was assassinated by unidentified gunmen at his home, says the PM.

Moïse had been ruling Haiti by decree after delaying elections, sparking protests that he illegally stayed past his term. The country is also facing growing poverty and gang violence. pic.twitter.com/RFE927Zu2t

— AJ+ (@ajplus) July 7, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चीनने दिले जगाला आव्हान; पुन्हा एकदा विस्तारवादी भूमिका

Next Post

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्विकारला पदभार

Next Post
E5wIOzfVkAAU QT

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्विकारला पदभार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011