इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत ६५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते. पण, आता हा आकडा वाढला असून जवळपास ३ हजाराच्या आसपास या भूकंपात नागरिकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य अजूनही सुरू आहे. याभूकंपानंतर स्पेन, युनायटेड किंगडम आणि कतारच्या पथकानेही मदतकार्य सुरु केले आहे.
शुक्रवारी पहाटे भारतीय वेळेनुसार ३ वाजून ४१ मिनिटांनी हा भूंकप झाला होता. या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल एवढी आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या माराकेश शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचे धक्के ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही जाणवले. मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी सशस्त्र दलांना विशेष शोध आणि बचाव पथकं आणि सर्जिकल फील्ड हॉस्पिटल तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत,
उत्तर आफ्रिकेतील देश मोरोक्कोमध्ये झालेल्या या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या. तर लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले होते. भूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या सर्वाधिक घटना माराकेशच्या जुन्या शहरात घडल्या आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरोक्कोमधील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांपैकी संवेदना व्यक्त केल्या होत्या.
Death toll from earthquake in Morocco nears 2800, relief efforts continue
Earthquake in Morocco; More than 300 civilians died, many buildings collapsed
Morocco Earthquake Deaths Building Collapsed Calamity
Natural Disaster