रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खरोखरच देशाचे नाव बदलणार… पंतप्रधान मोदींच्या टेबलवर ‘इंडिया’ ऐवजी दिसले ‘भारत’

by India Darpan
सप्टेंबर 9, 2023 | 12:34 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
F5kEjidagAApnoR

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, G-20 बैठकीचे उद्घाटन केले. आफ्रिकन युनियन हा भारताच्या अध्यक्षतेखालील G-20 चे स्थायी सदस्य बनला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी अतिथी देशांच्या सदस्यांना आणि नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या त्यांच्या टेबलावर ठेवलेल्या लाकडी नेमप्लेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. यावेळी विशेष म्हणजे नेमप्लेटवर जगात सर्रास वापरल्या जाणार्‍या ‘इंडिया’ या नावाऐवजी ‘भारत’ लिहिलेले होते. त्यामुळे आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे की देशाचे नाव नक्कीच बदलणार आहे.

G-20 कार्यक्रमादरम्यान भारत मंडपम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या डिनरचे निमंत्रण पत्र राष्ट्रपतींनी ‘द प्रेसिडेंट ऑफ भारत’च्या वतीने पाठवले आहे. या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेल्या ‘भारत’ या शब्दावरून आता राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार देशाच्या नावावरही डल्ला मारत असल्याचे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, राज्यघटनेच्या कलम १ मध्ये भारत, जो इंडिया होता, तो राज्यांचा संघ आहे, असे सांगत असताना त्यातून इंडिया हा शब्द का काढला जात आहे. मात्र, काँग्रेस नेते शशी थरूर यांचे म्हणणे आहे की, संविधानात इंडिया आणि भारत या दोन्हींचा उल्लेख असताना त्यात घटनात्मक आक्षेप नसावा. मात्र या नावाबाबत केवळ काँग्रेसच नाही तर भारतीय जनता पक्षाचे नेतेही भारताच्या समर्थनार्थ ट्विट आणि वक्तव्ये करत आहेत.

घटनादुरुस्तीद्वारे नाव बदलण्याची चर्चा
G-20 मध्ये भारत हे नाव वापरण्यात आल्याने या चर्चेलाही वेग आला आहे. इंडियाचे नाव बदलून भारत करण्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून, केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये इंडियाऐवजी भारत हे नाव वापरण्यास सुरुवात करणार आहे आणि संसदेतही इंडिया हे नाव कायमस्वरूपी भारत असे बदलले जाऊ शकते, अशी अटकळ सुरू झाली आहे.

BHARAT.. did you spot it ?

#G20Bharat pic.twitter.com/ZlxrpHGpz9

— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) September 9, 2023

G20 Summit PM Narendra Modi India Table Name Plate Bharat

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

G20 परिषद मोदींनी केले विदेशी पाहुण्यांचे स्वागत… तेथे होते कोणार्क चक्र… असे आहे त्याचे महत्त्व

Next Post

मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपाचा मृत्यूचा आकडा २८०० च्या आसपास, शेकडो इमारतीचे नुकसान, मदतकार्य सुरुच

Next Post
F5kNsyPasAAXWZ

मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपाचा मृत्यूचा आकडा २८०० च्या आसपास, शेकडो इमारतीचे नुकसान, मदतकार्य सुरुच

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011