‘शुक्रवार (१४ जुलै)पासून मध्यम पावसाची शक्यता’
जुलै महिन्याचे १० दिवस उलटले आहेत. तरीही राज्याच्या अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय पेरण्याही १०० टक्के झालेल्या नाहीत. त्यामुळे यापुढील दिवसांवर सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
शुक्रवार दि.१४ जुलैपासून खान्देश, नाशिकपासून ते सांगली सोलापुर पर्यंतच्या १० जिल्ह्यात व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील ५ दिवस म्हणजे सोमवार दि.१७ जुलैपर्यन्त मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
मराठवाड्यात मात्र केवळ तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.
कोकणात चालु असलेला पावसाची तीव्रता तीव्रता तशीच टिकून राहील.
महाराष्ट्रात आतापर्यंत भाग बदलत झालेल्या पावसामुळे ८ इंचापर्यंतच्या पूर्ण ओलीवर सोयाबीनची पेरणी झाली असुन काही ठिकाणी सध्या चालु आहे.
जेथे खास ओल नाही तेथे पेरीसाठी वाट पाहण्याचा काळ जरी अंतिम टप्प्यात असला तरी अजुनही वाट पाहण्यास तेथे वाव आहे, असे वाटते.
शिवाय त्यानंतरही २१ जुलैपासून पावसाच्या शक्यतेमुळे पूर्ण पेर ओलीसाठी वाट पहावीच, असे वाटते. शेवटी निर्णय शेतकऱ्यांनीच घ्यावा, असे वाटते.
बद्री-केदार अजुन आठवडाभर पावसाचा धुमाकूळ असु शकतो. त्यानंतर त्यापुढील १५-२० दिवसापर्यंत तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यास काळ लोटला जाईल. तेंव्हा पर्यटकांनी एकूण एक महिन्यापर्यन्त तेथील पर्यटनाचा विचार करू नये, असे वाटते.
इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५