यंदाचा मान्सून आणि महाराष्ट्र
देशाचा अर्थमंत्री अशी ओळख असलेला मान्सून पुढील महिन्यात भारतात दाखल होईल. त्याच्या येण्यावर आणि बरसण्यावरच सारे काही अवलंबून आहे. खासकरुन शेतकऱ्यांची त्याच्याकडे सर्वाधिक ओढ लागून असते. यंदाचा मान्सून कसा असेल याबाबत भारतीय हवामान विभागाने दुसरा अंदाज जाहीर केला आहे. आता आपण या मान्सूनबाबत आणि खासकरुन त्याच्या महाराष्ट्रातील बरसण्याबाबत अधिक जाणून घेऊ….
वायव्य भारत वगळता देशात पाऊस सरासरी इतकाच राहील. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जून महिन्यात महाराष्ट्रात तापमानात वाढीबरोबरच जाणवेल पावसाची ओढ राहील. पावसाळ्यात ‘ एल- निनो ‘चा दणका तर आयओडीचा दिलासा मिळेल. तर, मान्सून अजून अंदमानाच्या दक्षिणेकडे जागेवरच. अशी संक्षिप्तपणे यंदाच्या मान्सूनची वैशिष्ट्ये आहेत.
हवामान खात्याने दुसऱ्या पायरीतील सुधारित अंदाज देतांना वायव्य भारत वगळता देशात सरासरी इतका म्हणजे ९६ ते १०४%±४ पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
पावसाळ्यात ‘ एल- निनो विकसित होण्याच्या दाट शक्यते बरोबरच केवळ धन आयओडी चे अस्तित्वामुळे सकारात्मक दिलासाही अंदाजात दिलेला आहे.
वायव्य भारतात (जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब हरियाणा दिल्ली चंदीगड राजस्थान उत्तर मध्य प्रदेश व पश्चिम उत्तर प्रदेश ह्या राज्यात) मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची म्हणजे ९२% पेक्षाही कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
देशात ९६ ते १०४% श्रेणीत पडणारा पाऊस हा जरी सरासरी इतका पाऊस मानला जात असला तरी ह्या वर्षी देशात गुणात्मकदृष्ट्या (क्वान्टीतटेटिवली) केवळ ९६ %±४ पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे नकारात्मक शक्यतेच्या अंकानुसार ही शक्यता (९६-४) म्हणजे ९२ % येते, कि जी सरासरीपेक्षा कमी (>९० ते ९५% पेक्षा कमी) पावसाच्या श्रेणीत मोडते, हे ही येथे लक्षात घेणे गरजेचे वाटते. येथेही ही नकारत्मकताही जाणवते.
प्रॉबॅबिलीटीच्या भाषेत देशात सरासरी इतका पावसाचे भाकीत वर्तवतांना सर्वाधिक ‘भाकित संभाव्यता ‘ ही ४३ % आली आहे तर सर्वाधिक ‘वातावरणीय संभाव्यता’ ही ३३% आली आहे. बाकी सर्व शक्यता ह्या वरील दोन अंकांच्या खालीच आहे. आता ह्या दोन्हीही शक्यता संकल्पना स्पष्ट करतांना संपूर्ण २०२२-२३ वर्षात जागतिक पातळीवरून गेल्या ८ महिन्यापासुन भाकीतासाठी आवश्यक असलेली सर्व गोळा केलेल्या निरीक्षणांची नोंद व त्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजेच ‘भाकीत संभाव्यता ‘ होय.
तर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या डेट्यावरून निष्कर्षांप्रत आलेली शक्यता म्हणजे ‘वातावरणीय संभाव्यता’ होय.
महाराष्ट्रासाठी काय?
महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. मध्य भारतात जरी सरासरी इतका पाऊस वर्तवला असला तरी ‘टरसाइल’ श्रेणी प्रकारनुसार सांगली जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात सरासरी पेक्षा कमीच पावसाचीच शक्यता असुन ही सर्वाधिक शक्यता ही ५५% जाणवत आहे. कोकण व सह्याद्रीच्या पूर्वेकडील मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची सर्वाधिक वातावरणीय संभाव्यता ही ३५% जाणवते. सांगली जिह्वा व लगतच्या परिसरात मात्र सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
एकंदरीत जून ते सप्टेंबर ह्या ४ महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक जाणवते. महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता जरी असली तरी जर पडणाऱ्या पावसाचे योग्य वितरण झाल्यास व उपलब्ध पूर्वपाणीसाठा व वेळेत मान्सूनचे आगमन झाल्यास ह्या आधारे कदाचित शेतपिके हंगाम कदाचित जिंकता येऊ शकतो असेही वाटते.
महाराष्ट्राबरोबरच लगतच्या गुजराथ दक्षिण म. प्र. व छत्तीसगड, राज्यात तसेच उत्तरपूर्व कर्नाटक, दक्षिण आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या काही भागात टरसाइल’ प्रकारनुसार सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता जाणवते.
जून महिन्यात महाराष्ट्र तेलंगणा व आंध्रप्रदेशात जून महिन्याच्या सरासरीपेक्षा पावसाची शक्यता असुन पावसाच्या ओढीबरोबरच जून महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमान असण्याची सर्वाधिक शक्यताही ५५% जाणवते.
पाकव्याप्त व उर्वरित काश्मीर, लेह लडाख कर्नाटक केरळ ता. नाडू व पूर्वोत्तरच्या काही राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
नैऋत्य मान्सून एव्हाना श्रीलंकेच्या मध्यावर यावयास हवा असतांना अजुनही अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील नानकवरी बेटावरच गेल्या ७ दिवसापासून रेंगाळलेला जाणवत आहे. पुढील २ दिवसात त्याच्या वाटचालीस अनुकूल वातावरणाची शक्यता जाणवते.
दुसऱ्या पायरीतील मान्सून अंदाजाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगाम नियोजनसंबंधी माहिती उद्याच्या मेसेजमध्ये दिली जाईल.
मंगळवार दि. ३० मे पासुन शुक्रवार २ जूनपर्यंत ४ दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण व उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Monsoon Maharashtra Forecast Rainfall