मान्सूनचे आगमन आणि आगामी दिवसांचे हवामान
मान्सून देशात ४ जूनला दाखल होण्याची शक्यता. तर, मुंबईकरांची उष्णतेमुळे घालमेल कायम तर विदर्भ, खान्देशात उष्णटते बरोबर धुळीचे लोट व वावटळींचीही शक्यता आहे.
मान्सून ह्यावर्षी देशाच्या प्रवेशद्वाराशी म्हणजे केरळात ४ जूनच्या दरम्यान आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे.
वायव्य भारतातील पहाटेचे किमान तापमान, दक्षिण भारतातील ४ राज्यातील पूर्वमोसमी पावसाचे वर्तन, दक्षिण चीन समुद्रातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणारी दिर्घलहरी उष्णता ऊर्जा, मलेशिया थायलंड पश्चिम कि. पट्टीवर १ ते दिड किमी. दरम्यानचे वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरावरील हवेचा दाब, बं. उ सागरातील बांगला देश इंडो्नेशिया दरम्यानचा पण साधारण १० किमी. उंचीवरील वाहणारा वारा ह्या ६ घटकांचे सतत निरीक्षणावरून हा मान्सून आगमनाचा अंदाज बांधला जातो.
सरासरी १ जून ह्या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून ४ दिवस उशिराने अपेक्षित असुन त्यातही कमी अधिक ४ दिवसाचा फरक जमेस धरला आहे. म्हणजे तो केरळात १ जून ते ८ जून ह्या ८ दिवसादरम्यान कधीही दाखल होवु शकतो. सरासरी तारीख १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून त्याच्या सरासरी तारीख म्हणजे साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. तो कदाचित ह्यावर्षी १५ जूनला मुंबईत दाखल होवु शकतो. त्यातही कमी अधिक ४ दिवसाचा फरक जमेस धरला तर त्याचे आगमन मुंबईत १० ते १८ जूनच्या दरम्यान केंव्हाही होवु शकते असे वाटते. अर्थात केरळात आगमन झाल्यानंतरच मुंबईतील त्याच्या आगमनाची तारखेचा अंदाज बांधता येईल.
खरं तर मुंबईतल्या आगमनानंतरच तो उर्वरित महाराष्ट्रात त्याचा प्रवेश ठरवता येईल. म्हणजेच आजपासुन १ महिन्यानंतरच उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनची भेट अपेक्षित करू या! हे जरी खरं असले तरी मान्सूनचे आगमन व ४ महिन्यात पडणारा मान्सून ह्या दोन स्वतंत्र गोष्टी असुन त्यांच्या भाकीतांचे निकषही स्वतंत्र आहेत. भारतीय हवामान विभागाकडून ३१ मे दरम्यान मान्सूनसंबंधी सुधारित अंदाज येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मान्सूनची टक्केवारी व वितरणाचा अंदाज येईल.
दिवसाचे कमाल उच्चं तापमान व आर्द्रतायुक्त व गरम अश्या हवेमुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या काहिलीने जाणवत असलेली अस्वस्थता कायम असुन अजुनही पुढील २ ते ३ दिवस म्हणजे शनिवार २० मे पर्यन्त जाणवू शकते असे वाटते. महाराष्ट्रातील संपूर्ण खान्देश( नंदुरबार धुळे जळगांव) व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस म्हणजे गुरुवार १८ मेपर्यन्त उष्णतेबरोबरच वेगवान झटक्याखालील धुळीचे लोट उठवणाऱ्या वाऱ्यामुळे वावटळींची शक्यता जाणवते. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पुढील ५ दिवस तापमानात फरक जाणवणार नाही.
SW Monsoon 2023 onset over Kerala likely to be on 4th June as compared to the normal onset date of 1st June.
– IMD
केरळमध्ये SW मान्सून 2023 ची सुरुवात 1 जूनच्या सामान्य सुरुवातीच्या तारखेच्या तुलनेत 4 जून रोजी होण्याची शक्यता आहे.-आयएमडी https://t.co/iziQ6DPA8K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 16, 2023
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते, पुणे.
मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Monsoon Date and upcoming days weather forecast