इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मंकीपॉक्सची लागण झालेल्या एका गर्भवती महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. अमेरिकेतील ही घटना आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचा जन्म सुरक्षितपणे झाला असून आई आणि मूल दोघेही ठीक आहेत. सीडीसीचे डॉ. जॉन ब्रूक्स म्हणाले की, एका गर्भवती महिलेने निरोगी बाळाला जन्म दिला.
अधिका-यांनी सांगितले की, यापूर्वीही असे घडले आहे की, आईच्या उदरात वाढणाऱ्या किंवा जन्मलेल्या बाळाला संसर्ग झाला आहे. मात्र, यावेळी तसे झाले नाही. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा कधीकधी खूप वाईट परिणाम होतो आणि त्याची चाचणी करणे देखील एक आव्हान असते. एजन्सीने म्हटले आहे की गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांना आधी उपचार दिले जावेत.
सीडीसीकडून सांगण्यात आले की मुलाला इम्यून ग्लोबिन देण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने इम्यून ग्लोबिन अँटीबॉडी उपचार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. अमेरिकेतील दोन मुलांमध्ये मंकीपॉक्सचा विषाणू आढळून आला आहे. त्याच वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 3596 रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओने देखील सल्ला दिला आहे की जर एखाद्याला मंकीपॉक्स असेल तर त्यांनी आपल्या जोडीदारासोबत सेक्स करणे टाळावे.
भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची चार बाधित आढळून आले आहेत. त्याचबरोबर अनेक राज्यांनी अॅडव्हायजरी जारी केली आहे. परदेशातून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सरकारनेही तयारी तीव्र केली आहे. केंद्र सरकारने मंकीपॉक्स लस आणि चाचणी किट बनवण्यासाठी कंपन्यांसाठी निविदा काढल्या आहेत.
Monkey Pox Infected Pregnant Lady Given birth to Child USA America Healthy Baby