शनिवार, डिसेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बापरे! यात्रेत तब्बल ५० फुटावरुन पाळणा कोसळला; बघा, अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडिओ

सप्टेंबर 5, 2022 | 12:08 pm
in संमिश्र वार्ता
0
Capture 16

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संस्कृतीत सण उत्सवाप्रमाणेच यात्रांनाही महत्त्वाचे स्थान आहे. या यात्रांमध्ये विशेष आकर्षण असते. मात्र, पंजाबमधील मोहालीत यात्रेत एक गंभीर दुर्घटना घडली आहे. या यात्रेत आकाश पाळणा तब्बल ५० फुटावरुन अचानकपणे जोरदार कोसळला. या अपघातात २०हून अधिक जण जखमी झाले आहेत. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

मोहालीत दसरा मैदानावर भरलेल्या जत्रेत एक विचित्र घटना घडली. या जत्रेत एक झुला हवेत तुटला आणि तब्बल ५० फुटांवरुन खाली कोसळला. या झुल्यावर जवळपास ५० जण बसले होते. सुदैवाने या घटनेत कोणाचा जीव गेलेला नाही मात्र २० जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या जत्रेतील आकाश पाळणा अचानक कोसळला. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. पाळणा कोसळताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाळणा कोसळल्यानंतर मैदानात एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. आकाश पाळणा थेट जमीनीवर आपटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा पाळणा जमीनीवर आपटल्यानंतर पाळण्यात बसलेले लोक बाहेर पडल्याचे थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मोहालीच्या सेक्टर ६५ मध्ये एका जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. येथे एका झुल्यावर जवळपास ५० लोक बसले होते. पण, अचानक ५० फुटांच्या उंचीवर असताना हा झुला तुटला आणि कुणीही काही करण्याच्या आत तो थेट जमिनीवर येऊन कोसळला. ही दुर्घटना इतकी भीषण होती की बघणारा प्रत्येक जण हादरुन गेला. तसेच ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. आरडोओरड ऐकून नागरिक जमले, त्यानंतर जखमीना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाचा संपूर्ण तपास करुन दोषींवर कारवाई केली जाईल.

विशेष म्हणजे येथे रुग्णवाहिका, पीसीआर सुविधा नव्हती. जत्रेतील आकाश पाळण्याचे बाऊन्सर हे जागेवर नव्हते. ते अपघाताच्या तब्बल २० मिनिटांनंतर घटनास्थळी आले. कोणत्याही सुरक्षा, आपत्कालीन व्यवस्थेशिवाय ही जत्रा कशी सुरु होती? असाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले की, ‘आम्हाला रात्री ९-९.१५ वाजता कळाले की जत्रेत झुला पडला आहे. आतापर्यंत १५ जण आमच्याकडे आले आहेत. आलेल्यापैकी कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

https://twitter.com/laasiyapriya/status/1566481372545355777?s=20&t=KM_vEqec6dFP3u1ekLf6SQ

Mohali Fair Swing Collapse Accident 20 Injured
Police Punjab

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महालक्ष्मी निमित्त येवल्यात घरगुती देखावे स्पर्धा (व्हिडिओ)

Next Post

भाविकाला ताटकळत ठेवले; तिरुपती देवस्थानला तब्बल ५० लाखाचा दंड

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
tirupati balaji

भाविकाला ताटकळत ठेवले; तिरुपती देवस्थानला तब्बल ५० लाखाचा दंड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011