नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील चलनातून ५००, १००० आणि २००० रुपयाच्या नोटा बंद केल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार आता ७५ रुपयांचे नाणे आणणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तशी घोषणा केली आहे. येत्या रविवारी संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त ७५ रुपयांचे नाणे जारी करण्यात येणार आहे. या नाण्यावर नवीन संसद भवन संकुलाचे चित्र छापण्यात येणार आहे. २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवन संकुलाचे उद्घाटन करणार आहेत.
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसनुसार, ७५ रुपयांचे हे नाणे गोलाकार असेल आणि त्याचे क्षेत्रफळ ४४ मिमी असेल. या नाण्याच्या बाजूला २०० शिळे बनवण्यात आले आहेत. हे नाणे ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त मिसळून तयार केले जाणार आहे.
नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल आणि अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत भारत लिहिलेले असेल. त्याचप्रमाणे नाण्याच्या वरच्या बाजूला देवनागरी भाषेत संसद भवन लिहिलेले असेल आणि त्याचवेळी त्याच्या खाली संसद भवन संकुलाचे चित्र छापले जाईल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीनुसार करण्यात आली आहे.
१० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती. संसद भवनाच्या नवीन संकुलाच्या बांधकामासाठी ८६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता पण नंतर तो १२०० कोटी रुपये खर्च झाला. मात्र, संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबतही बरेच राजकारण होत आहे. खरे तर विरोधी पक्ष नवीन संसद भवन संकुलाचे उद्घाटन करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करत आहेत. यामुळेच २० विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या नवीन संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
संसद भवनाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन न करणे, राष्ट्रपतींना समारंभासाठी आमंत्रित न करणे हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की, सभापती हे संसदेचे संरक्षक आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केले आहे. या मुद्द्यावर राजकारण करू नये.
Modi Government Will Launch New Coin Currency