सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोदी सरकारने आतापर्यंत किती बेरोजगारांना नोकरी दिली? मंत्र्यांनी संसदेत दिली ही आकडेवारी…

by India Darpan
ऑगस्ट 8, 2022 | 5:03 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
job

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील बेरोजगारीची समस्या किती मोठी आहे याचा अनुभव नागरिक घेतच आहे. आता आणखी एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे देशात सरकारी नोकऱ्यांसाठी २२.०५ कोटी अर्ज २०१४ ते २०२२ या दरम्यान व्यवस्थेला प्राप्त झाले. त्यापैकी ७.२२ लाख उमेदवारांनाच सरकारी नोकरी मिळू शकली आहे. विविध शासकीय विभागांमध्ये या नियुक्त्या झाल्या आहेत.

देशातील रोजगाराबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, २०१४ पासून केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये एकूण ७ लाख २२ हजार ३११ लोकांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ – १५ मध्ये १ लाख ३० हजार ४२३ लोकांना नोकऱ्या मिळाल्या. २०१५ – १६ मध्ये १ लाख ११ हजार ८०७ लोकांना, २०१६ – १७ मध्ये १ लाख ०१ हजार ३३३ लोकांना, २०१७ – १८ मध्ये ७६ हजार १४७ लोकांना नोकऱ्या मिळाल्या. २०१८ – १९ मध्ये ३८ हजार १०० लोकांना तर २०१९ – २०२० मध्ये १ लाख ४७ हजार ०९६ लोकांना नोकऱ्या मिळाल्या. २०२० – २१ मध्ये ७८ हजार ५५५ लोकांना नोकऱ्या मिळाल्या तर २०२१ – २२ मध्ये ३८,८५० लोकांना नोकऱ्या मिळाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी असेही म्हटले आहे की “रोजगार निर्मितीसह रोजगार कार्यक्षमता सुधारणे ही सरकारची प्राथमिकता आहे. याशिवाय देशात रोजगार निर्मितीसाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत.” तसेच २०२१ – २२ च्या अर्थसंकल्पात पाच वर्षांच्या कालावधीसाठी १.९७ लाख कोटी रुपयांच्या खर्चासह उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना सादर केल्या आहेत. सरकार राबवत असलेल्या PLI योजनांमध्ये ६० लाख नवीन रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना सरकार स्वयंरोजगार सुलभ करण्यासाठी राबवत आहे. पीएमएमवाय अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा देण्यात आली होती. त्याच्या मदतीने लोक सूक्ष्म आणि लघु व्यवसाय स्थापन करू शकतात किंवा वाढवू शकतात. याशिवाय रस्त्यावर वस्तू विकणाऱ्यांना कोरोना महामारीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. बरेच दिवस त्यांचे उत्पन्न ठप्प होते. अशा परिस्थिती लक्षात घेऊन, सरकारने १ जून २०२०पासून पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडरची आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी योजना) लागू केली आहे, जेणेकरून रस्त्यावर विक्रेते त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करू शकतील.

या उपक्रमांव्यतिरिक्त मेक इन इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी मिशन, कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल मिशन, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार यांसारखे सरकारचे विविध प्रमुख कार्यक्रम. हमी योजना, पं. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, दीन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान इत्यादी देखील रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने आहेत अशी माहितीही जितेंद्र सिंह यांनी दिली.

Modi Government Job Minister Parliament Answer

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीच्या ब्रेकअपचं खरं कारण आलं समोर

Next Post

उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण संपत्ती किती? कुठे कुठे आहे? घ्या जाणून…

Next Post
Uddhav Thackeray2

उद्धव ठाकरे यांच्याकडे एकूण संपत्ती किती? कुठे कुठे आहे? घ्या जाणून...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011