इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या अभिनयापेक्षाही फटकळ बोलणं आणि अत्यंत तोकड्या कपड्यांसाठी उर्फी जावेद प्रसिद्ध आहे. चित्रविचित्र कपडे घालणे, तसेच काहीतरी वादग्रस्त बोलून चर्चेत राहणं हा तिचा आवडता छंद आहे. आताही पुन्हा एकदा ती अशाच बेलगाम बोलण्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल तिने अपशब्दांचा वापर करत त्याच्यावर टीका केली आहे. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. आता मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून ‘मुव्ह ऑन’ झाल्याचेही उर्फीने आवर्जून नमूद केले.
काय म्हणाली उर्फी?
युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया याला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने अनेक खुलासे केले आहेत. यावेळी उर्फीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर जोरदार टीका करत त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रणवीरने मुलाखतीदरम्यान, उर्फीला तिचा एक्स बॉयफ्रेंड तसेच रिलेशनशिपबाबत प्रश्न केला. यावर उर्फी सांगते की, माझ्या एक्स बॉयफ्रेंडचे इतके वाईट अनुभव माझ्या गाठीशी आहेत की, मला आता कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये राहायचे नाही. ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केले त्यानेच मला फसवले. मी त्याच्या नावाचा टॅटू काढला होता, परंतु त्या मुलाने तुझ्या वाढदिवसाच्या तारखेचा टॅटू काढतो असे सांगून मला फसवले. त्याच्या वडिलांच्या आणि माझ्या वाढदिवसाची तारीख एक असल्याने, हा वडिलांसाठी काढलेला टॅटू आहे असे त्याने सर्वांना सांगितले. तेव्हा मी अशी वेड्यासारखी वागत होते. पण आता माझ्याकडे पैसे असल्याने मला कोणाचीही गरज नाही, असेही उर्फी सांगते.
https://twitter.com/Urfijaved7/status/1649709550466105344?s=20
आई आजही उडवते खिल्ली
माझ्या एक्स बॉयफ्रेंडसाठी मी टॅटू काढणे माझ्या आईला कधीच पटले नाही. यावरून माझी आई आजही माझी खिल्ली उडवते. “जा आता आणखी काही टॅटू काढ” असे आई मला आजही सांगत असल्याचे उर्फीने मुलाखतीदरम्यान सांगितले.
https://twitter.com/Urfijaved7/status/1652942382235787265?s=20
Model Urfi Javed Ex Boy Friend Angry Curse