India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मॉडेल उर्फी जावेदने खरेदी केली ही आलिशान कार; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या अतरंगी स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असलेली मॉडेल म्हणजे उर्फी जावेद. तिची हटके स्टाईल नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिने एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. विशेष म्हणजे तिने ही गाडी आपल्या टीम आणि स्टाफसाठी घेतली आहे.

उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. थांबा, नेहमीप्रमाणे तुम्हाला जर तो तिच्या कपड्यांचा व्हिडीओ असेल, असं वाटत असेल, तर ते तसं नाही. हा व्हिडीओ आहे तिच्या गाडीचा. व्हिडीओमध्ये ती तिच्या नवीन गाडीवरून पडदा काढताना दिसते आहे. उर्फीने गाडीच्या शोरूममध्येच केक कापत नवीन गाडी खरेदी केल्याचं सेलिब्रेशन केलं. ऑडी किंवा बीएमडब्ल्यू नाही तर नवी कोरी एसयूव्ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत २५ ते ३१ लाखांच्या दरम्यान आहे.

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फीनं ही गाडी तिच्यासाठी नाही तर तिच्यासोबत काम करणाऱ्यांसाठी घेतली आहे. याचं कारण म्हणजे शूटिंगच्या ठिकाणी तिच्या टीमला रिक्षाने यावं लागतं. त्यामुळेच तिच्या पहिल्या गाडीपेक्षा ही मोठी गाडी तिने घेतली आहे.“ या गाडीत माझा मॅनेजर, माझा मेकअप आर्टिस्ट, बाउंसरसोबत सगळे आरामात बसू शकतात,” असं उर्फी म्हणाली. नेहमी शब्दाला शब्द वाढवून वाद घालताना दिसणाऱ्या उर्फीचा हा हटके अंदाज सर्वांनाच भावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Tellychakkar Official ® (@tellychakkar)

Model Urfi Javed Buy new Luxurious Car


Previous Post

कामगारांना मिळणार हक्काचे घर; कामगारमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा

Next Post

‘मलाही लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागले’, अभिनेता पियुष मिश्रांनी सांगितला धक्कादायक अनुभव

Next Post

'मलाही लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागले', अभिनेता पियुष मिश्रांनी सांगितला धक्कादायक अनुभव

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group