इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केवळ प्रसिद्धीसाठी म्हणून वाट्टेल ते वक्तव्य करणाऱ्या माणसांची चित्रपट सृष्टीत काही कमी नाही. अभिनय जमत नसला तरी चालेल, पण काही न काहीतरी करून चर्चेत राहायचे, हेच यांचे ध्येय असते. अशाच व्यक्तींमध्ये पूनम पांडे हिचा समावेश होतो. तुम्हा लोकांना कदाचित पूनम पांडे लक्षात असेल. ‘भारत सामना जिंकला, तर कपडे काढेन’, असे खळबळजनक वक्तव्य तिने अनेक वर्षांपूर्वी केले होते.
पूनम पांडेच्या या वक्तव्याने तेव्हा खूप खळबळ उडाली होती. मला काहीही करून चर्चेत राहायचे होते, म्हणून मी हे विधान केल्याचे आता पूनम सांगते. खरं तर तेव्हादेखील तिच्या या बोलण्यावर तिच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती, हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्याबाबत स्वतः पूनम पांडे हिनेच खुलासा केला आहे. बोल्ड स्टेटमेंट्स करणारी पूनम तिच्या बोल्ड लूक आणि न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
कायमच वादात असणाऱ्या पूनम पांडेचा ११ मार्च रोजी वाढदिवस आहे. आज तिची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या त्या चर्चेतील स्टेटमेंटबद्दल बोलते आहे. २०११ मध्ये पूनम पांडे पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. त्यावेळी तिने भारतात सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान एक वक्तव्य केलं होतं, ज्याची चांगलीच चर्चा झाली होती.
भारताने विश्वचषक जिंकला तर मी कपडे काढेन, असं पूनम पांडेने त्यावेळी म्हटलं होतं. त्या एका वक्तव्यामुळे ती खूपच चर्चेत होती. किंबहुना त्यानंतरच तिला ओळख मिळाली. पूनम पांडेने ‘रेडिओ मिर्ची’ला दिलेल्या मुलाखतीत ते वक्तव्य का केलं होतं, याचा खुलासा केला. तसेच त्यानंतर तिच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती, यावरही तिने भाष्य केले आहे.
Baby ? pic.twitter.com/f3OT3JiL71
— Poonam Pandey (@iPoonampandey) November 7, 2022
पूनम पांडे सांगते, “मी तेव्हा १८ वर्षांची होते आणि विचार करत होते की मला आयुष्यात काय करायचं आहे. काहीतरी मोठं करण्याच्या विचारात मी होते. तेव्हा विश्वचषक सुरू होता आणि संपूर्ण देश क्रिकेट पाहतो. मला क्रिकेटचे ज्ञान अजिबात नाही. क्रिकेटपटूंची नावंही मला माहीत नाहीत. पण काहीतरी मोठं करण्याच्या विचाराने मी ते खळबळजनक वक्तव्य केलं. मी तेच केलं आणि भारत विश्वचषक जिंकला.”
पूनम पांडे पुढे म्हणाली, “मी बोलून तर बसले, नंतर मला भीती वाटत होती की आता मला हे करावं लागतंय की काय? माझ्या वक्तव्यानंतर घरात प्रचंड गोंधळ सुरू होता. माझे आई – वडील माझ्यावर प्रचंड भडकले होते. म्हणूनच मी याबद्दल त्यानंतर कधीही बोलले नाही, मला कोणीही ओळखत नाही, प्रत्येकजण मला याच स्टेटमेंटमुळे ओळखतो. बॉडी शो ऑफ करणं हिला आवडतं, असा लोकांचा समज आहे. आणि, तो खराही आहे. कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला ही संधी हवी होती आणि ती मी घेतली.
Model Poonam Pandey on Team India Win and Cloths Statement