रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोबाईल इंटरनेट स्पीडः ट्रायने प्रसिद्ध केली आकडेवारी; बघा, तुमची कंपनी कोणत्या क्रमांकावर?

4G डाउनलोड स्पीडसह जिओ अव्वल; 4G अपलोड स्पीडमध्ये Vi पहिल्या क्रमांकावर

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 1:25 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई – सध्याचा जमाना हा मोबाईल आणि इंटरनेटचा आहे. स्मार्टफोनमुळे तर अनेकांचे जीवनच बदलले आहे. सरकारी तसेच खासगी कंपन्यांकडून मोबाईल सेवा पुरविली जाते. इंटरनेटचा अपलोड आणि डाऊनलोड स्पीड किती हे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. यासंदर्भात ट्रायने नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या कंपनीचे इंटरनेट वापरता, ती कोणत्या क्रमांकावर आहे याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.

अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा 4G डाउनलोड स्पीडमध्ये अव्वल असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने ऑक्टोबर महिन्यासाठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जिओ चा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 21.9 Mbps इतका मोजला गेला. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 1 एमबीपीएसची वाढ झाली असून सप्टेंबर महिन्यात जिओ चा 4G डाउनलोड स्पीड 20.9 Mbps होता.

टेलिकॉम क्षेत्रातील तीन प्रमुख कंपन्यांचा 4G स्पीड वाढला आहे. आणि प्रत्येक वेळी प्रमाणे, यावेळी देखील रिलायन्स जिओ ने पुन्हा एकदा एअरटेल आणि वी (Vodafone-Idea) ला सरासरी 4G डाउनलोड स्पीडच्या बाबतीत मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. जिओचा 4G डाउनलोड स्पीड एअरटेलपेक्षा 8.7MBPS आणि वी पेक्षा 6.3MBPS जास्त होता. सरासरी 4G डाउनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओ सातत्याने प्रथम क्रमांकावर आहे.

रिलायन्स जिओच्या मागे असलेल्या एअरटेलने 13.2 Mbps 4G डाउनलोड स्पीड नोंदवला. सप्टेंबरच्या तुलनेत त्याच्या वेगात 1.3Mbps ची किंचित वाढ झाली आहे. एवढी वाढ करूनही एअरटेल गेल्या अनेक महिन्यांपासून सलग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलरने त्यांचे व्यवसाय विलीन केले आहेत आणि आता ते व्होडाफोन-आयडिया म्हणून काम करत आहेत, परंतु एप्रिल 2021 पर्यंत, ट्राय दोन्हीचे आकडे वेगळे दाखवत असे. मे महिन्यापासून ट्रायने दोन्ही कंपन्यांचा डेटा Vi India या नावाने प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे.

व्होडाफोन आयडिया कडील डेटा म्हणजेच Vi India दर्शविते की ऑक्टोबर महिन्यात कंपनीचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 1.2 Mbps ने वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये, वी इंडियाची सरासरी 4G डाउनलोड गती 15.6 Mbps इतकी मोजली गेली. वी ने भारती एअरटेलला कायमस्वरूपी तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. कंपनी सलग दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

डाउनलोड्सप्रमाणेच सरासरी 4G अपलोड स्पीडमध्ये भारती एअरटेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीचा सरासरी अपलोड वेग 5.2 एमबीपीएस होता. वी 7.6 Mbps सह सरासरी 4G अपलोड गतीसह चार्टमध्ये अग्रस्थानी आहे. रिलायन्स जिओने 6.4 Mbps च्या अपलोड स्पीडसह दुसरा क्रमांक पटकावला. मायस्पीड ऍप्लिकेशनच्या मदतीने गोळा केलेल्या रिअल टाइम डेटाच्या आधारे TRAI द्वारे सरासरी वेग मोजला जातो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आठवणीतले साहित्य संमेलन : …आणि माझी राहण्याची व्यवस्था झाली

Next Post

नाशिक जिल्हा नियोजन निधी वादः मालेगावच्या आमदारानेही केली ही तक्रार (व्हिडिओ)

Next Post
IMG 20211116 WA0014

नाशिक जिल्हा नियोजन निधी वादः मालेगावच्या आमदारानेही केली ही तक्रार (व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011