इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भाविकांनी खचाखच भरलेल्या एका मिनी ट्रकमध्ये एका भक्ताच्या मोबाईलचा गेम खेळताना स्फोट झाला आहे. यामुळे ट्रकने पेट घेतला आणि यामुळे लागलेल्या आगीत लहान मुलांसह १०हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात असलेल्या साहवा पोलिस स्टेशन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे ३५ भाविक एका मिनी ट्रकमधून चुरू जिल्ह्यातील दादरेवा येथील गोगाजीच्या जन्मस्थानी पोहोचले होते. त्यानंतर ते शनिवारी रात्री गोगामेडी येथून मिनी ट्रकने दिल्लीकडे रवाना झाले. मिनी ट्रकच्या मागे फोमच्या गाद्या टाकून भाविक बसले होते. यातील अनिकेत हा १४ वर्षीय मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. अचानक त्याच्या मोबाईलने पेट घेतला. तारानगर भागातील साहवा शहराजवळ अचानक स्फोट होऊन मोबाईलचा स्फोट झाला आणि आग लागली.
जळणारा मोबाईल अनिकेतच्या हातातून निसटून मिनी ट्रकमध्ये ठेवलेल्या गादीवर पडला आणि त्यामुळे गादीने पेट घेतला. परिणामी वाहनालाही आग लागली. यामध्ये १०हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या ट्रकमधील सर्व व्यक्ती या दिल्लीतील दक्षिणपुरी भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांच्या मदतीने आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यानंतर आगीत भाजलेल्या सर्व सहा जखमींना प्रथम चुरू येथील साहवा सीएचसीमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर आता चुरू येथील शासकीय भरतिया जिल्हा रुग्णालयात सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
Mobile Blast While Game Playing 20 Peoples Injured
Rajasthan Churu District