मुंबई – शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सर्वस्तरातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. तसेच, बाबासाहेब आणि राज यांचा मोठा स्नेह होता. राज यांनी त्यांच्या पक्षाची स्थापना सुद्धा बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार केली आहे. पुणे दौऱ्यात राज हे बाबासाहेबांना भेटण्यास आवर्जून जात. राज यांनी बाबासाहेबांसाठी आज एक व्यंगचित्र काढले आहे. ते असे