गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुकानांना मराठी पाट्याः राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला हा इशारा

by India Darpan
जानेवारी 13, 2022 | 1:12 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
raj thakre

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील दुकानांना मराठी पाट्या लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. याबाबत राज यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला चांगलाच टोला लगावला आहे. तसेच, या निर्णयाचे खरे श्रेय हे मनसे आणि मनसैनिकांना असल्याचेही म्हटले आहे.

राज यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरं तर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलने केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला. तेव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच.

राज पुढे लिहितात की, यानिमित्त महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, याची अंमलबजावणी नीट करा. यात आणखी एक भानगड सरकारने करुन ठेवली आहे ती म्हणजे, मराठी भाषेशिवाय इतर भाषेचेही नामफलक चालतील. याची काय गरज आहे. महाराष्ट्राची भाषा देवनागरी लिपीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार. आणि याची आठवण आम्हाला पुन्हा करायला लावू नका. महाराष्ट्र सैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन

FI9ve0zacAIYHMq

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकारने दुकानांच्या पाट्या बाबतचा घेतलेला निर्णय आणि त्याबाबतची सक्ती ही अनाकलनीय; प्रदीप पेशकार यांची टीका

Next Post

नाशिकमध्ये १५ एसटी कामगारांवर गुन्हे दाखल; हे आहे कारण

India Darpan

Next Post
fir.jpg1

नाशिकमध्ये १५ एसटी कामगारांवर गुन्हे दाखल; हे आहे कारण

ताज्या बातम्या

doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011