India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नगरपालिका, महापालिकेतील तुमचे काम आता होणारच… आमदार दराडेंनी २ मनपा आणि १७ नगरपालिकांना दिली ही अनोखी भेट

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका व महानगरपालिकाचे कामकाज पूर्णत संगणीकृत झाले आहे. मात्र जुनाट व नादुरुस्त संगणक,प्रिंटरची अडचण भेडसावत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे यांच्या निधीतून जिल्ह्यातील दोन्ही महापालिकांसह १७ नगरपालिका व नगरपरिषदांना तब्बल १५० संगणक,१५० प्रिंटर व २९ झेरॉक्स मशीन देण्यात आले आहे.आज येथून या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

महानगरपालिका व नगरपालिकांतून लेआउट, विकासकामांचे ठराव, जन्ममृत्यूचे दाखले यासह प्रत्येक काम संगणीकृत झाले आहे.मात्र शासनाकडून संगणक व तत्सम साहित्य खरेदीसाठी मर्यादित स्वरूपात अनुदान मिळते, संगणकाची गरज जास्त मात्र साहित्याची उपलब्धता कमी असल्याने अनेक पालिकांकडून आमदार निधीतून हे साहित्य मिळण्याची मागणी आमदार दराडे यांच्याकडे झाली होती.त्याची दखल घेऊन हे संगणकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नाशिक नगरपालिकेला ४५ संगणक व ४५ प्रिंटर तर पाच झेरॉक्स मशीन देण्यात आले आहे.

मालेगाव महापालिकेलाही पंधरा संगणक व १५ प्रिंटर तसेच तीन झेरॉक्स मशीन देण्यात आले आहे. याशिवाय येवला,मनमाड,नांदगाव, सटाणा,देवळा,कळवण,दिंडोरी, चांदवड,निफाड,सिन्नर,देवळाली, भगूर,त्रंबकेश्वर,इगतपुरी,सुरगाणा, पेठ व ओझर या नगरपालिका व नगरपरिषदेला तीन ते दहाच्या दरम्यान संगणक,प्रिंटर व एक ते दोन झेरॉक्स मशीन उपलब्ध करून दिले असून सुमारे दोन कोटी दहा लाख रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात आला आहे.यामुळे सर्वच नगरपालिकांचे कामकाज संगणीकृत अध्यायावत होणार असून प्रशासकीय कामकाजांना गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार दराडे यांनी बोलताना व्यक्त केला.

येवला नगरपालिकेत शुभारंभ!
विधापारिषद आमदार नरेंद्र दराडे यांच्या विकासनिधीतून येथील नगरपरिषद कार्यालयास १० संगणक संच,१० प्रिंटर व ३ झेरोक्स मशीनचे वितरण आज करण्यात आले.आमदार दराडे यांच्या हस्ते हे संगणक व साहित्य वितरण करण्यात आले.प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी कार्यालयीन कामकाजाला गती देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल यावेळी आमदार दराडे यांचे आभार मानले.यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर,छाया क्षिरसागर,माजी नगरसेवक दयानंद जावळे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासकीय कामाला गती मिळावी
“नागरिक विविध स्वरूपाचे अनेक कामे महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये घेऊन येतात.मात्र अनेकदा या कामांना अडथळेही येतात.त्यामुळे जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी ही अडचण व्यक्त केली होती. त्यामुळे अत्याधुनिक पद्धतीने काम जलद व्हावे,नगरपरिषदेचा कार्यभार संगणीकृत होऊन प्रशासकीय कामाला गती मिळावी,नागरिकांचे कामे वेळेत व्हावेत यासाठी कार्यालयांना संगणक व प्रिंटर उपलब्ध करून दिले आहे.”
– नरेंद्र दराडे, आमदार, येवला

MLA Narendra Darade Donation Corporations


Previous Post

अफ्रिकेच्या जंगलात ‘खतरो के खिलाडी’चे शुटींग… अभिनेत्री नायरा बॅनर्जीला दुखापत… म्हणाली, किड्यांमुळे माझ्या प्रायव्हेट पार्टला…

Next Post

ई सिगारेटबाबत केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post
प्रातिनिधीक फोटो

ई सिगारेटबाबत केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group