इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील तब्बल २० जिल्ह्यात एकही शालेय गणवेश पोहचला नाही, झेंडावंदनला नवीन कपडे सुद्धा हे सरकार शालेय मुलांना देऊ शकले नाही, किती दुर्भाग्य आपले ? कसा स्वतंत्र्यदिन त्यांनी साजरा करायचा ? असा प्रश्न करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली.
आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपण भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत, परंतु मुख्य प्रश्न हा आहे की कोणत्या प्रकारचा स्वातंत्र्योत्सव आपण साजरा करतोय? असेही त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी महिलांवर कार्यालयात बलात्कार करण्याचं स्वातंत्र्य? बलात्काराला आत्महत्या म्हणून सिद्ध करण्याचे स्वातंत्र्य?
अन्यायाविरूद्ध आवाज उठविणा-यांची तोंडे बंद करण्याचं स्वातंत्र्य? जोपर्यंत तुमच्या जवळच्या कुणावर बलात्कार होत नाही तोपर्यंत मूग गिळून बसण्याचं स्वातंत्र्य? एखाद्या डॉक्टरवर संकट आलेलं असताना त्याची बिलकूल तमा न बाळगता मूक प्रेक्षक होण्याचं स्वातंत्र्य? स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही महिला तिच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही. खरंच याला स्वातंत्र्य म्हणायचं का? असा प्रश्नही केला आहे.