इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – स्वतःच्याच लग्नात जाण्यासाठी कुणी विसरेल का आणि असे असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. पण हे खरे आहे. ओडिशातील बिजू जनता दलाचे आमदार बिजय शंकर दास स्वतःच्या लग्नात जायला विसरले. आमदाराने महिनाभरापूर्वी आपल्या मैत्रिणीसोबत लग्न करायचा निर्णय घेतला होता. पण ते लग्नाला आलेच नाही त्यामुळे आता त्यांच्या प्रेयसीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. त्यानुसार आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगतसिंगपूर येथील उपनिबंधक कार्यालयात तिर्तोल मतदारसंघाचे आमदार विजय शंकर दास यांचे नोंदणी पद्धतीने लग्न होणार होते. त्यांची मैत्रीण सोमालिका ठरलेल्या वेळेनुसार उपनिबंधक कार्यालयात पोहोचली. पण वेळ उलटून गेली तरी आमदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही तेथे आले नाही. तब्बल तीन तास वाट पाहिल्यानंतर निराश झालेल्या सोमालिका यांना निबंधक कार्यालयातून बाहेर पडावे लागले. लग्न करण्याचे वचन देऊनही आमदार विजय विवाह निबंधक कार्यालयात आले नाहीत, असा आरोप या प्रकरणामुळे दुखावलेल्या सोमालिकाने केला आहे. या संदर्भात शहरातील सदर पोलिस ठाण्यात आमदार व त्यांच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
सोमालिका विजय दाससोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. आमदाराने तिची फसवणूक करून त्रास दिल्याचे तिचे म्हणणे आहे. आमदार विजय शंकर यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही आणि त्यांच्या फोन कॉल्सला उत्तर देत नसल्याचा आरोपही तिने यात केला आहे. याबरोबरच आमदाराचे नातेवाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही आपल्याला धमकावले आहे असाही आरोप तिने केला आहे. १७ मे रोजी उपनिबंधक कार्यालयात विवाह नोंदणीसाठी अर्ज केला होता. जेव्हा प्रत्यक्ष लग्न करण्याची वेळ आली तेव्हा आमदाराने पळ काढला असे ती म्हणाली आहे.
mla forgotten to go at self wedding odisha bijay das biju janata dal police complaint