India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भुजबळांच्या `त्या` वक्तव्यावरून आमदार देवयानी फरांदे यांनी केली टीका

India Darpan by India Darpan
September 29, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर गेला की समाजातील दोन वर्गांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचे वक्तव्य हा याच प्रयत्नाचा भाग असल्याची टीका आमदार देवयानी फरांदे यांनी केली. काहीही संबंध नसताना छगन भुजबळ यांनी सरस्वती देवी विषयी जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी चुकीचे वक्तव्य केले. या वक्तव्यामागे हिंदुत्ववादी विचार व ओबीसी समाज यांच्यात दुही निर्माण करणे हा उद्देश आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले हे अस्तिक होते. देव देवतांवर त्यांची श्रद्धा होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे काव्य फुले काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर शंकर पार्वतीचे चित्र आहे. ओबीसी समाज हा हिंदू समाजाचा कणा आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी तो हिंदू धर्मापासून लांब जाणे शक्य नाही. असे सांगतानाच. अडीच वर्ष छगन भुजबळ राज्यात मंत्री होते त्यांच्या पक्षाचे सरकार होते त्यावेळेस सरस्वती देवीचा फोटो काढण्याची हिम्मत का दाखवली नाही ? असा सवाल उपस्थित करताना. हिंदुत्वाचा देखावा करणारी शिवसेना आता शांत का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. देव देवता व धर्म हे महत्त्वाचे आहेतच त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. या दोन्ही बाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नितांत आदर आहे. अशा प्रकारचे नाहक वक्तव्य करून महाराष्ट्रात दोन समाजा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ साहेब यांनी करू नये अशी विनंती आमदार देवयानी फरांदे यांनी केली. सध्या महाराष्ट्रात नवरात्र महोत्सव सुरू असताना सगळीकडे आदिशक्तीचा गजर सुरू असताना अशा प्रकाराने टीका करून समाजातील वातावरण गढूळ करण्याच्या प्रयत्नाचा करावा तितका निषेध कमी आहे अशा भावांना देखील त्यांनी व्यक्त केल्या.


Previous Post

पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करायचे आहे? तातडीने येथे नाव नोंदणी करा

Next Post

ऊसावरील घोणस अळीची दहशत! दंशाने अनेक शेतकरी जखमी; अशी घ्या काळजी

Next Post

ऊसावरील घोणस अळीची दहशत! दंशाने अनेक शेतकरी जखमी; अशी घ्या काळजी

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group