नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने आज एक वेगळाच प्रसंग घडला. भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांचीच भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचेच एक पुस्तक त्यांना भेट म्हणून दिले, इतकेच नव्हे तर त्यातील भीक मागणे, असा उल्लेख वाचून दाखवला. महात्मा फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली. या चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मात्र आपण वापरलेल्या शब्दात काही गैर नव्हते, असे पटवून देण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी प्रबोधनकार ठाकरे यांचेच एक पुस्तक दाखवले.
उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन यासारख्या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. प्रबोधनकार ठाकरे यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये, अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला होता.
कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली असे वादग्रस्त विधान भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टिका केली आहे. भाजपमध्ये हे अशा प्रकारचे बौद्धिक दारिद्र्य असलेले मंत्री आहेत, असे म्हणत त्यांनी पाटलांना फटकारले होते, महाविकास आघाडीने सरकार विरोधात मुंबईत विराट असा महामोर्चा काढला होता. यावेळी आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर प्रचंड टिका केली होती. हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.
या पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे. हा उल्लेख चंद्रकांत दादांनी उद्धव ठाकरे यांना दाखवला. आपण केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकातदादांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना आपली बाजू सांगितली. खरे म्हणजे आपण वापरलेल्या शब्दात काही गैर नव्हतं, हे पटवून देण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक दाखवत आपली बाजू मांडली. या पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे. हा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना वाचून दाखवला.
एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोक होती. आता १० कोटी रुपये देणारे लोक आहेत. त्यानंतर महापुरुषांनी भीक मागितल्याचे वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटलां विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पिंपरी येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईदेखील फेकण्यात आली. त्यानंतर त्यांनी सदर वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शब्दाच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचेच पुस्तक भेट म्हणून दिले. त्यातील संदर्भ वाचून दाखवला. यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे तसेच आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती. आता उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.
उपराजधानी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापती आ. @neelamgorhe जी तसंच माजी मुख्यमंत्री आ. @OfficeofUT जी यांची भेट झाली. या वेळी त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं आत्मचरित्र 'माझी जीवनगाथा' हे पुस्तक भेट दिलं. त्यांच्याशी चर्चाही झाली. pic.twitter.com/iR20z8MCyi
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) December 20, 2022
Minister Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray Given This Book
Politics BJP Shivsena Nagpur Maharashtra Winter Assembly Session