बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हे आहे भारताचे मिनी स्वित्झर्लंड; पर्यटनासाठी येथे हमखास जाच

by India Darpan
मे 26, 2022 | 10:07 pm
in इतर
0
IMG 20201218 WA0026

 

भारताचे मिनी स्वित्झर्लंड – चोपटा (उत्तराखंड)

चोपटा हे उत्तराखंड मधील अगदी छोटे गाव आहे. या पूर्ण परिसराचे निसर्ग सौंदर्य पाहून त्यास स्वर्गाची उपमा दिली आहे. चोपटा हे भारताचे मिनी स्विर्त्झलॅंड म्हणूनही ओळखले जाते. आज याच अनोख्या आणि निसर्गरम्य ठिकाणाविषयी आपण जाणून घेणार आहोत….

भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

चोपटा या ठिकाणाहून हिमालयातील अनेक शिखरांचे दर्शन होते. उदा. नंदादेवी, बंदरपूछ, त्रिशूळ,चौखंबा. हे ट्रेकींगसाठी उत्तम ठिकाण असून येथे अॅडव्हेंचर गेम्सची सुविधा आहे. येथे मुक्काम ठेऊन आपण तुंगनाथ, देवरीताल, चंद्रशिला असे काही हटके ट्रेक करु शकतो. हे फारसे अवघड ट्रेक्स नाहीत. तसेच येथून जवळच उखीमठ हे गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केदारनाथाचा सहा महिने मुक्काम असतो. असे सांगतात की, केदारनाथ मंदिर बंद झाल्यावर केदारनाथ येथे राहतात. केदारनाथ पालखीचा सोहळा खास बघण्यासारखा असतो.

या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून १३ हजार फूट आहे. चोपटा गावचा परिसर पाईन, देवदार, र्‍होडोडेंड्राॅन या वृक्षांच्या जंगलांनी वेढलेला आहे. तसेच या प्रदेशात अनेक दुर्मिळ पशु, पक्षी आढळतात. बर्फवृष्टी (स्नोफाॅल) नंतर तर हा संपूर्ण परिसर डोळे दीपावणाराच असतो. चोपटा हे हिमालयीन प्रदेशात असल्याने एप्रिल ते जुलैपर्यंत येथे स्वच्छ सूर्यप्रकाशाचे वातावरण असते.

हा काळ येथे जाण्यासाठी सर्वात योग्य समजला जातो. मात्र सोबत भरपूर थंडीचे कपडे हवेत. या काळात हिमवृष्टी व कॅंम्पिंगचा आनंद घेता येतो. तसेच येथून जवळच औली, लॅंडसडाऊन, व्हॅली ओफ फ्लावर्स अशी अनेक ठिकाणे आहेत. अशा या निसर्गरम्य, सुंदर व फारशी गर्दी नसलेल्या प्रदूषण विरहित निसर्गसंपन्न पर्यटन स्थळाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

कसे पोहचाल
१) विमानाने जाणार्‍यांसाठी  जाॅलीग्रांट (डेहराडून) हे विमानतळ चोपटापासून २२१ किमी अंतरावर आहे. नाशिक-दिल्ली-डेहराडून किंवा मुंबई-डेहराडून विमानसेवा उपलब्ध आहे.
२) रेल्वेने ऋषिकेश पर्यंत व तेथून पुढे टॅक्सीने चोपटा पर्यंत जाता येते. नाशिककरांसाठी हरिद्वार एक्सप्रेसने थेट हरिद्वार पर्यंत रेल्वे सेवा मिळू शकते.
३) रस्ते मार्गाने उत्तराखंडातील सर्व प्रमुख शहरांशी चोपटा जोडलेले आहे.

कुठे रहाल
चोपटा येथे टेंट, कॅम्प, सर्वसाधारण हाॅटेल्स उपलब्ध आहेत. उखीमठ/गुप्तकाशी येथे काही उत्तम हाॅटेल्स आहेत.

तेथील हवामान
मार्च ते मे या काळात ६ ते २९ अंश सेल्सिअस
जून ते सप्टेंबर या काळात १७ ते ३१ अंश सेल्सिअस
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात २ ते २२ अंश सेल्सिअस

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – २७ मे २०२२

Next Post

मालेगावच्या चार फुटी नवरा नवरीच्या लग्न सोहळ्याची जोरदार चर्चा (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
IMG 20220526 WA0206

मालेगावच्या चार फुटी नवरा नवरीच्या लग्न सोहळ्याची जोरदार चर्चा (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011