मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षा २०२३चा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला आहे. अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) आणि औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल आज सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.
हा निकाल जाहीर झाल्यानंतर फार्मसी आणि इंजिनिअरींग पदवीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरू होणार आहे. कॅप राउंडचे वेळापत्रकही लगेच जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करावी लागणार आहे.
सर्व प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यंदा प्रथमच मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश नोंदणीपासून सर्व काही करता येणार आहे. याच अॅपमध्ये विद्यार्थ्यांना सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे ही बाब विद्यार्थी व पालकांना दिलासादायक ठरणार आहे.
√ महा सी.ई.टी सेल,मुंबई यांच्यातर्फे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ फार्मसी व डॉक्टर ऑफ फार्मसी या व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया निकालानंतर लगेच सुरू होणार आहे.
√ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन *फॅसिलिटेशन सेंटर* (FC Center) कॉलेजमध्ये जाऊन करावयाचे आहे.
√ ऑनलाइन रजिस्ट्रेशनसह डॉक्युमेंट वेरिफिकेशन व कन्फर्मेशन ऑफ एप्लीकेशन ही प्रक्रिया कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण करणे आवश्यक आहे. (३ प्रक्रिया : रजिस्ट्रेशन,डॉक्युमेंट वेरिफिकेशन व कन्फर्मेशन)
√ वरील प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना साधारणता ७ ते ८ दिवसांचा कालावधी मिळू शकणार आहे.
√ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन साठी आवश्यक सर्व डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी तयार ठेवावी.
√ ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठीचे महत्त्वपूर्ण लिंक अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे.
https://technical.mahacet.org/
*सूचना :* अजून ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावयाची आहे. १२ जून नंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
MHT CET Result 2023 Date Declared