नाशिक – भुसावळ – इगतपुरी मेमू रेल्वे १० जानेवारीपासून सुरु होणार आहे. या गाडीला मेलचे तिकीट आकारले जाणार असून ती सात स्थानकांवर थांबणार आहे. ही गाडी रोज भुसावळ जंक्शनवरुन सकाळी ७ वाजता सुटेल त्यानंतर ७.२६ ला जळगाव, १०.०९ ला चाळीसगाव, १२.०८ मनमाड, १३.२३ नाशिक, त्यानंतर दुपारी ३ वाजता इगतपुरीला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी सकाळी ९.१५ वाजता इगतपुरी येथून सुटणार आहे. तर भुसावळ जंक्शन येथे ५.१० वाजता पोहचेल. ही गाडी आठ डब्ब्याची असणार आहे. हे आहे मेमुचे वेळापत्रक …..