मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावच्या कॅम्प भागातील आदिवासी सेवा सामितीच्या सिध्दार्थ वसतिगृहातील मुलांवर वसतिगृहाच्या पाहरेक-यांकडून विद्यार्थांना बेदम मारहाण करुन हाताने शौचालय साफ केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर मोठा जमाव वसतिगृहावर जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. अन्याय करणाऱ्या पाहरेकरी व संस्थाचालकांवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान समाज कल्याण विभाग व जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान संस्थेने कालच या वसतिगृहातील तीन कर्मचाऱ्यांना टर्मिनेट केल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे. निकृष्ठ दर्जाचे जेवण व मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असतांना संस्थाचालक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.