मुंबई – सावित्रीबाई फुले रूग्णालयातील वातानुकूलित यंत्र बिघाडानंतर झालेल्या अपघातामुळे आजतागायत चार बालके मृत्युमुखी पडली आहेत. या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित करण्यात येत असून, यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसृतीगृहामधील वातानुकूलित यंत्र बिघाडामुळे झालेल्या अपघातातबाबत स्थगन प्रस्ताव मांडला होता. यामध्ये सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1473970984168296448?s=20
या स्थगन प्रस्तावास उत्तर देताना नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, बालकांचा मृत्यू होणे ही घटना अतिशय संवेदनशिल असून दुर्देवी आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचेही श्री.शिंदे यांनी सांगितले.