नाशिक – सेक्स पॉवर वाढविण्याच्या उपचारासाठी गेलेल्या एका वृद्धाला कथित आयुर्वेदिक वैद्याने सात लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. याबाबत
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत तर विक्रम ठाकूर बाबा दयानंद व राजकुमार गव्हाणे असे वृद्धाला गंडा घालणार्या भोंदू वैद्याचे नाव आहे.
या आरोपीने वृध्दाला जयशंकर गार्डन, तपोवन येथील अनोळखी आयुर्वेदिक वैद्याकडे बोलावले. त्यांना लैंगिक क्षमता वाढविण्याच्या बहाण्याने उपचारासाठी नग्न व अर्धवट फोटो काढून नंतर ब्लॅकमेल करत वेळोवेळी पैसे मागितले. त्यानंतर भोंदू वैद्याने दिलेल्या पंजाब नॅशनल बँक व स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्यावर ४ सप्टेंबर २०१९ ते २२ डिसेंबरपर्यंत वृध्दाने वेळोवेळी एकूण ६ लाख ९० हजार रुपये भरले. त्यानंतर २३ ऑक्टोबर २०२१ रोजी फिर्यादीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाव नग्नावस्थेतील फोटो व प्रिंट केलेले पत्र प्रसारित करून, तसेच हा डाटा डिलिट करण्यासाठी बाबा दयानंद याने पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली. वारंवार होणार्या पैशाच्या मागणीला कंटाळून अखेर वृध्दाने भोंदू वैद्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आता या तक्रारीवरुन पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.