फारूखाबाद (उत्तर प्रदेश) – नोकरी लागत नाही म्हणून उच्च शिक्षण घेण्याकडे तरुणांचा कल आहे. परंतु तरीही त्यांना नोकरी मिळत नाही त्यामुळे काही जणांना नैराश्य येते. काहीतरी मात्र नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एखादा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करतात. उच्चशिक्षित असूनही त्यांना कोणतेही काम करण्याची लाज वाटत नाही, असेच तरुण आपल्या जीवनात पुढे जातात, समाजात अशी काही उदाहरणे दिसून येतात. विशेष म्हणजे उद्योग व्यवसाय करताना ती वेगळी शक्कल लढवतात किंवा युक्ती वापरतात.
फारूखाबाद शहरातील एका गृहनिर्माण वसाहतीतील पुतळ्याजवळ रोज लावली जाणारी ही हातगाडी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एक तरुण आपल्या पुतण्यासोबत येथे पावभाजी आणि ब्रेड विकत होता. ‘एमबीए फेल कचोरी वाला’ हे नाव का? याला उत्तर देताना या तरुणांशी संबंधित कथा समोर आली आहे, ती केवळ रंजकच नाही तर अनेकांना प्रेरणा आणि प्रोत्साहनही देते.
सत्यम या तरुणांने बीएस्सी किंवा एमबीए पास होण्याचा विचार केला आणि अभ्यासही सुरू केला, पण कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होऊ शकला नाही आणि नापास झाला. चार वर्षे उलटली, पण एमबीएचे स्वप्न कायम आहे. अभ्यासात आर्थिक अडचण येत होत्या म्हणून एका महिन्यापासून हात गाड्यावर पावभाजी चालवायला सुरुवात केली आहे. चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला शाळेमध्ये नापास झालेला सत्यमला त्याचा पुतण्या नितीन या व्यवसायात मदत करतो.
https://twitter.com/ZeeNews/status/1467317886293184516?s=20
सत्यम सांगतो की, त्याच्या वडिलांकडे सात बिघे जमीन आहे. त्याचा मोठा भाऊ शिवदत्त मिश्रा दिल्लीत राहतो. तीन बहिणी विवाहित आहेत. तो स्वतः आणि एक बहीण अविवाहित आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो चांगला अभ्यास करू शकला नाही आणि एमबीएमध्ये नापास झाला. येथील हजरत निजामुद्दीन पदवी महाविद्यालय बकराई येथून बीएससी केले आहे. आता हातगाडीवर डिजिटल पेमेंट करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या दुकानातून चांगली कमाई झाली तर एमबीएला प्रवेश घेईन आणि उत्तीर्ण झाल्यावर दाखवू, असे त्याने सांगितले.