इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या सचिन तेंडूलकरची मैदानात पुन्हा एकदा धुवांधार खेळी पाहायला मिळाली. सचिनने वयाच्या ४९व्या वर्षी चांगली खेळी केल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या खेळाचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सचिन तेंडूलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीदेखील त्याचा चाहतावर्ग आजही मोठा आहे. वर्ल्ड सेफ्टी सीरीजच्या १४व्या सामन्यात तेंडूलकरने जबरदस्त खेळी केली. २० चेंडूत त्याने ४० धावा काढल्या. इंग्लंड लिजेंड बरोबर नुकतीच त्यांची मॅच झाली. या मॅचमध्ये निवृत्त झालेले खेळाडू क्रिकेट खेळत असल्याचे पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. या मॅचमध्ये सचिनने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्या जबरदस्त खेळाने चाहते अवाक् झाले आहेत. त्याचा व्हिडीओ चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
सामन्यात अचानक पाऊस सुरु झाल्याने काहीवेळ मॅच थांबवण्यात आली होती. त्याचबरोबर कालची मॅच १५ ओव्हरची खेळवण्यात आली. टीम इंडिया लिजेंडचा ४० धावांनी विजय झाला. याच मॅच व्यतिरिक्त जगभरातील जेवढे खेळाडू हॉटेलमध्ये मस्ती करत आहेत. टीम इंडीयाच्या माजी खेळाडूंचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सचिन तेंडूलकरचा परवा एक ऑम्लेट करीत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो चाहत्यांना आम्लेट कसं बनवतात हे सांगत होता. विशेष म्हणजे त्या व्हिडीओ ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ब्रेट ली याने देखील कमेंट केली होती. तो म्हणत होता, की उद्या मी नाष्टा करायला येतोय.
Just @sachin_rt things !! pic.twitter.com/BHwARvuuVs
— Sachinist (@Sachinist) September 22, 2022
Master Blaster Sachin Tendulkar Batting Video Viral
Cricket Match Sports
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/