ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडले असून त्यातच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव आणखीनच कडाडले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाहना ऐवजी सीएनजी वाहनांना अधिक मागणी वाढली आहे. मारुती सुझुकी इंडियाने आज Dzire S-CNG लाँच केले आहे. यात के-सिरीज ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी 1.2 लीटर इंजिन आहे. डिझायर सीएनजी 31.12 किलोमीटरचे जबरदस्त मायलेज देईल. Maruti Suzuki Dzire S-CNG ची सुरुवातीची किंमत रु. 8 लाख 14 हजार (एक्स-शोरूम) आहे. त्याच वेळी, ZXI मॉडेलची किंमत 8 लाख 82 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. सबस्क्रिप्शनद्वारे मारुती सुझुकी डिझायर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला CNG व्हेरिएंटसाठी 16,999 रुपये मोजावे लागतील.
Dzire CNG VXI मॉडेलमध्ये चार पॉवर विंडो, टिल्ट-अॅडजस्टेबल स्टीयरिंग व्हील आणि मल्टी-फंक्शन कंट्रोल्स, ड्युअल टोन फॅब्रिक फिनिश इंटीरियर आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, 2 DIN म्युझिक सिस्टम, चार स्पीकर, मॅन्युअल एअर कंडिशनिंग आणि रिअर एसी व्हेंट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
Dzire CNG ZXI मॉडेलला फॉग लॅम्प, आतील भागात लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील, पुश बटण स्टार्ट/स्टॉप फीचर, एक टच ड्रायव्हर साइड विंडो अॅडजस्टमेंट आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळते. यात Android Auto आणि Apple CarPlay सह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळते. दोन्ही ट्रिम्समध्ये ड्युअल एअरबॅगसह ABS आणि EBD, हाय स्पीड अलर्ट, ड्रायव्हर आणि सह-प्रवाशासाठी सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड सेन्सिंग दरवाजा लॉकिंग आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर देखील मिळतात.
मारुती डिझायर CNG मध्ये 1.2-लिटर ड्युएलजेट, 4-सिलेंडर, एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 89 hp पॉवर आणि 113 Nm टॉर्क बनवते. तर सीएनजी फॉरमॅटमध्ये ते 77 एचपी पॉवर आणि 98.5 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनला जोडलेले आहे. यामध्ये एएमटी पर्याय नाही जो पेट्रोल व्हेरियंटवर दिसतो.
मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, जग हरित ( ग्रीन वर्ल्ड ) भविष्याकडे वाटचाल करत आहे. मारुती सुझुकीने हिरव्या वाहनांच्या वाढत्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी सतत काम केले आहे. S-CNG सारख्या परिवर्तनीय तंत्रज्ञानामुळे ग्राहक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी S-CNG वाहने खरेदी करत आहेत.
शशांक श्रीवास्तव म्हणाले की, आज आमच्याकडे 9 S-CNG वाहनांचा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. एस-सीएनजी वाहनांच्या चांगल्या मायलेजमुळे त्यांची मागणी वाढली आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांत आमच्या S-CNG विक्रीत 19 टक्क्यांची CAGR वाढ पाहिली आहे. ग्राहक तांत्रिकदृष्ट्या प्रगत, पर्यावरणपूरक, फॅक्टरी-फिट आणि सुरक्षित मारुती सुझुकी एस-सीएनजी वाहने अधिकाधिक अवलंबत आहेत.