बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मृत्यूनंतर मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेवर कर लागतो का? हायकोर्ट म्हणाले…

by India Darpan
मार्च 9, 2022 | 3:53 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
court

 

इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – एखाद्या व्यक्तिच्या मृत्युनंतर त्याच्या कुटूंबियांना नुकसानभरपाई म्हणून मिळालेली रक्कम उत्पन्न मानून त्याच्यावर प्राप्तिकर कायद्यानुसार कर आकारला जाऊ शकतो का, अशी विचारणा गुजरात उच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला केली आहे. पॅन अमेरिकन वर्ल्ड कंपनीच्या विमान अपहरणात मृत्यु झालेल्या एका महिलेचया पतीने याविषयी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्याच्या पत्नीच्या मृत्युप्रकरणात त्याला २० कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती.

१९८६च्या विमान अपहरण प्रकरणात पत्नीच्या मृत्यूसाठी मिळालेल्या २० कोटी रुपयांच्या भरपाईवर कर भरण्यासाठी प्राप्तिकर विभागाने गुजरातच्या कल्पेश दलाल यांना नोटीस पाठवली होती. १४ मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत खंडपीठाने आयकर विभागाकडून या प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत. याचिकाकर्त्याला न्यूयॉर्क कोर्टाने २०१४ – १५ मध्ये भरपाई दिली होती. याचिकाकर्त्याची पत्नी तृप्ती हिचा १९८६मध्ये पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजच्या फ्लाइटच्या अपहरणात मृत्यू झाला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ५० जणांमध्ये तिचा समावेश होता. न्यूयॉर्क कोर्टाने कल्पेश दलालला २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये २० कोटी रुपयांची भरपाई दिली होती. कल्पेशने मात्र ही रक्कम त्याच्या २०१४ – १५ च्या टॅक्स रिटर्नमध्ये उत्पन्न म्हणून दाखवली नाही.

२०१४ मध्ये आयकर विभागाने कल्पेशला बोलावून या उत्पन्नाबाबत विचारणा केली होती. उत्तरात कल्पेशने सांगितले की, अमेरिकेतील कायदेशीर लढाईच्या निर्णयात भरपाई म्हणून हे पैसे मिळाले. प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षी हे प्रकरण पुन्हा उघडले आणि कल्पेशला नोटीस बजावून २० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईवर आयकर भरण्यास सांगितले. त्यानंतर कल्पेशने उच्च न्यायालयात धाव घेतली. तृप्ती दलाल ५ सप्टेंबर १९८६ रोजी तिच्या ११ वर्षाच्या मुलासह आणि २१ सदस्यांच्या नृत्य मंडळासह न्यूयॉर्कला पॅन अमेरिकन फ्लाइटने प्रवास करत होत्या. मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानात एकूण ३६० प्रवासी होते. चार पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील कराची येथून या विमानाचे अपहरण केले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ५० जणांमध्ये तृप्तीसह १३ भारतीय आणि दोन अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – पार्क केलेल्या अपघातग्रस्त मालट्रकमधील तब्बल २७ हजाराचे डिझेल चोरीला

Next Post

मारुतीने लाँच केली आणखी एक CNG कार; मिळेल एवढा जबरदस्त मायलेज

India Darpan

Next Post
Maruti Suzuki Dzire S CNG

मारुतीने लाँच केली आणखी एक CNG कार; मिळेल एवढा जबरदस्त मायलेज

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011