इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात गुगल हाच सर्वांचा गुरु तथा मार्गदर्शक बनला आहे. कारण, बहुतांश जण गुगलवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च करतात आणि त्यानुसार मार्गदर्शन घेऊन वाटचाल करत असतात गुगलच्या डेटा नुसार, विवाहित महिला सर्वाधिक सर्च त्यांच्या पतीला नक्की काय आवडते? हे कसे जाणून घ्यायचे हे सर्च करतात. त्यांची आवड-निवड काय आहे ? हे महिलांना जाणून घ्यायची असते. तसेच, विवाहित महिला आपल्या पतीचे मन कसे जिंकावे, त्यांना आनंदी कसे ठेवता येईल ? हे प्रश्न देखील वारंवार गुगलवर सर्च करतात.
आणखी आश्चर्यचकित करणारे सर्च म्हणजे, पतीला मुठीत कसे ठेवायचे हे देखील गुगलवर सर्च केले जाते. याशिवाय, फॅमिली प्लॅनिंग कधी करायचे? बाळाला जन्म देण्याची योग्य वेळ काय? असे प्रश्न देखील विवाहित महिला गुगलवर सर्च करतात. या प्रश्नांव्यतिरिक्त महिलांना जाणून घ्यायचे असते की, लग्नानंतर नवीन कुटुंबात गेल्यावर कसे वागावे? त्या कुटुंबाचा भाग कसे बनावे?
याशिवाय, कुटुंबाची जबाबदारी कशी सांभाळावी, हे देखील त्यांना जाणून घ्यायचे असते. आणखी महत्त्वाचे म्हणजे, ज्या महिला लग्नानंतर देखील नोकरी करतात त्या देखील गुगलवर अनेक गोष्टी सर्च करतात. लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय कसा सांभाळावा? कुटुंब व व्यवसाय या दोन्ही एकाच वेळी कशा सांभाळाव्यात? या गोष्टी देखील महिला गुगलवर सर्च करतात.
आपण आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी Google चा वापर करतो. खरे तर गूगल आपल्याला सर्च हिस्ट्री डेलीट करण्याचीही संधी देते. पण, आपण सर्च केलेली प्रत्येक माहिती गूगलवर कुठेना कुठे नक्कीच सेव्ह होते. यासंदर्भात अनेक जणांनी केलेला अभ्यास समोर आला आहे. यात विवाहित महिला Google वर सर्वात जास्त काय सर्च करतात, हे आढळून आले आहे. विवाहित महिला आपल्या पतीला आपल्या कंट्रोलमध्ये कसे ठेवावे? त्यांना ‘जोरू का गुलाम’ कसे बनवावे? हे सर्वाधिक सर्च करतात.
एवढेच नाही, तर त्यांच्या पतीला काय आवडते, त्याची चॉईस काय आहे आणि त्याला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा आहे. एखादी व्यक्ती गुगलवर काय सर्च करते हे त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी, राहणीमान यावरही अवलंबून असते. पण, विवाहित महिलांच्या सर्वसमावेशक वर्गात या महिला नेमकं काय सर्च करतात असा प्रश्न केला असता वरील लक्षवेधी उत्तरे समोर येतात.
Married Women Google Search Report Says
Technology Internet Husband Wife