मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पकालीन मंदीचा कल तटस्थ राहण्याचा किंवा तेजी मिळालेल्या क्षेत्रात परत येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सोन्याचा दर ५९,५०० रूपये आहे, ज्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. एमसीएक्स गोल्डचा दर ५९,७७० रूपयांखाली असेपर्यंत लहान व्यवहार फायदेशीर ठरू शकतात असे मत एंजल वन लिमिटेडचे कमोडिटी व करन्सी वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक श्री तेजस अनिल शिगरेकर यांनी सांगितले.
टेक्निकल आधारावर सध्या आरएआय (१४) ७० पेक्षा कमी आहे, ज्यामधून निदर्शनास येते की नकारात्मक विचलनासह ते अधिक खरेदी करण्यात आलेल्या झोनमध्ये आहे. किमती त्यांच्या ५०-दिवस एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेज (ईएमए)च्या वर व्यवहार करत आहेत. पण तक्त्यावरील दीर्घकालीन कालमर्यादा पाहण्यासोबत फिबोनाक्की रिट्रेसमेंट टूलचा वापर केला असता किमती ७८.६० टक्के फिब रेशोच्या आसपास असल्याचे आणि संभाव्य डबल बॉटम पॅटर्न निर्माण करत असल्याचे दिसून येते. यामधून निदर्शनास येते की, किंमतींमध्ये अल्पावधीत सुधारणा होईल. ही बाब लक्षात घेत ट्रेंड ट्रेडर्सनी या पातळीवर सोने खरेदी करण्यास संकोच करू नये. एमसीएक्स गोल्ड ५९८०० एसएल ५९५०० टीजीटी ६०४५०-६०७४० मध्ये खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
Market Business Gold Rates Increase