India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मराठी विश्वकोश कार्यालयासाठी येथे उभारणार नवी इमारत; दीड एकरमध्ये असणार या सर्व सुविधा

India Darpan by India Darpan
January 23, 2023
in राज्य
0

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी विश्वकोश कार्यालयासाठी वाई येथे नव्याने आद्ययावत इमारत उभारणार असल्याचे व त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाच्या इमारतीसाठी जागेची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मराठी विश्वकोशाचे सहसचिव शामकांत देवरे, पुरुषोत्तम जाधव, विकास शिंदे, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे आदी उपस्थित होते.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सुरु केलेले येथील विश्वकोश निर्मितीचे कार्य हा मराठी भाषेचा ठेवा आहे. तो जिवंत ठेवण्यासाठी व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक म्हणून विश्वकोशाची नवी इमारत ही अद्ययावत परिपूर्ण असेल. यामध्ये कार्यालय, अभ्यासिका, ग्रंथालय, अँफी थिएटर,अभ्यासिका अशा सुविधा दीड एकर जागेत उपलब्ध केल्या जातील. या इमारतीसाठी एका संस्थेची व एका खाजगी जागेची पाहणी करण्यात आली आहे.

विश्वकोश हा मराठी भाषेचा मानबिंदू आहे. ज्यावेळी येथे विश्वकोशाची अद्ययावत इमारत पूर्ण होईल त्याचवेळी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे स्वप्न पूर्ण होईल. शासन मराठी भाषेचा आणि विश्वकोशाचा प्रचार आणि प्रसार जगभर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नुकतेच मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

केंद्र सरकारकडून नव्याने शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षणासाठी मराठी भाषेचा वापर करण्यात येणार आहे. इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द उपलब्ध करण्याचे सामर्थ्य फक्त विश्वकोशात आहे. यामुळे पुढील काही महिन्यात हे मार्गी लावण्यात येईल. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अनेक प्रगल्भ शिक्षक असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावा, यासाठी शैक्षणिक स्तरावर एक मासिक सुरू करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील शाळांमधून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प राज्यातील शिक्षक व अभ्यासकांना उपलब्ध होतील. राज्यातील शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या समस्या समजून घेत आहोत. जेणेकरून राज्यातील शैक्षणिक धोरणाला चांगला आकार देता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

Marathi Vishvakosh Office New Building1.5 Acre Land


Previous Post

गुटखा खाऊन वकील न्यायालयात आला; मग, न्यायाधीशांनी हे केलं….

Next Post

मराठी वाचता येईना… गणित सोडवता येईना… राज्यातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अशी आहे अवस्था, बघा हा अहवाल काय सांगतो

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

मराठी वाचता येईना... गणित सोडवता येईना... राज्यातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अशी आहे अवस्था, बघा हा अहवाल काय सांगतो

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group