मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक चांगल्या आणि दर्जेदार मालिकांसाठी झी मराठी ही वाहिनी प्रसिद्ध आहे. या चॅनलवर एक नवीन मालिका सुरू झाली आहे. अभिनेत्री आणि अभिनेता अंकुश चौधरी याची पत्नी दीपा परब ही या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहे. गुणी कलाकार असली तरी बरीच वर्षे दीपा छोट्या पडद्यापासून लांब राहिली आहे. आता या मालिकेद्वारे तिने पुनरागमन केले आहे.
दीपा परबने अनेक लहान मोठ्या मालिकांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मध्यंतरीच्या काळात ती मराठी मालिकांपासून लांब गेली असली तरी हिंदी मालिका करून तिथेही तिने स्वतःची ओळख निर्माण केली. आता मोठ्या गॅपनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेद्वारे परतली आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून ती हे पुनरागमन केले असून, या मालिकेत ती ‘अश्विनी’ या मध्यवर्ती भूमिकेत आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1560173515105456128?s=20&t=CZ6ycGkp7TB1mp_AWgddtQ
आपल्या या नवीन मालिकेबद्दल दीपा खुपच उत्साही आणि आनंदी आहे. १० वर्षांनी मराठी पडदा आणि त्यातही झी मराठीवरील मालिका असल्याने ती फारच उत्साहात आहे. ती सांगते की, मी संधीची वाट पाहत होते, आणि मला हवी तशी संधी चालून आल्यावर मी ती लगेच स्वीकारली. खरं तर या भूमिकेसाठी हर्षदा खानविलकर हिने माझं नाव सुचवलं. तिच्यामुळेच मला ही मालिका मिळाल्याचे ती आवर्जून सांगते.
आपल्या भूमिकेबद्दल ती म्हणते की, अश्विनी ही माझी भूमिका सर्वसमावेशक आहे. घरातील प्रत्येकाची आवड जपत ती स्वतःची कर्तव्य पार पडते आहे. तसेच घराला एकत्र बांधूनही ठेवते. नवीन घर बांधण्यासाठी ती देखील तिच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करते. याच गोष्टींमुळे ही भूमिका सगळ्या महिलांना आपलीशी वाटेल याची मला खात्री वाटते. माझ्या या नवीन भूमिकेला प्रेक्षक कसे स्वीकारतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचे दीपा सांगते.
https://twitter.com/zeemarathi/status/1560168368543391745?s=20&t=CZ6ycGkp7TB1mp_AWgddtQ
Marathi TV Serial Tu Chal Pudha Actress
Entertainment Zee Marathi Deepa Parab