India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेमध्ये गौरी होणार आई; डोहाळे जेवणात शालिनीचा नवा डाव (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
September 15, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे ‘सुख म्हणजे काय असतं’. मालिकेच्या नावात जरी सुख असलं तरी या मालिकेतील मुख्य नायिकेसाठी सुख हे मृगजळच ठरताना दिसते आहे. यातील गौरी हिच्यापासून सुरू झालेले कथानक वेगळ्या वळणावर येऊन पोहचले आहे. घरातील मोलकरिणीची भूमिका असलेली गौरी मालिकेतील एका प्रचंड ट्विस्टने घरातील मालकीण झाली आहे. तर आता गौरी आणि जयदीप यांचं बाळ येणार आहे. त्यासाठी शिर्के पाटील यांच्या घरी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेचे जवळपास ५२० भाग झाले आहेत. उत्तम कथानकामुळे लोकप्रिय झालेल्या या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक ठरत आहे. कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची वाट पहात आहेत, ते सुख लवकरच शिर्के पाटील कुटुंबात येणार आहे. या कुटुंबात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब या चिमुकल्याचा आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आलाय. त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

गौरीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात शालिनीचा नवा डाव…
'सुख म्हणजे नक्की काय असतं !'
मंगळवार १३ सप्टेंबर रा. ९:३० वा. Star प्रवाह वर.#SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah pic.twitter.com/qzMi3UO3Ki

— Star Pravah (@StarPravah) September 10, 2022

माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळजेवणाची तयारी करण्यात आली आहे. गौरीच्या आवडत्या पदार्थांची मेजवानी असेलच सोबतीला फुलांच्या दागिन्यांनी गौरीला सजवण्यात आले आहे. शालिनी आणि देवकी डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत. मात्र गौरी आणि जयदीप यांच्या आयुष्यात येणार हे सुख शालिनी थोडीच शांत बसणार आहे? शालिनी ही झोपाळ्याचे स्क्रू सैल करते तेव्हा आता गौरीला अपघात होणार का अशी भीती प्रेक्षकांना वाटत असून मालिका रोमांचक वळणावर आहे.

गौरीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात शालिनीचा नवा डाव…
'सुख म्हणजे नक्की काय असतं !'
मंगळवार १३ सप्टेंबर रा. ९:३० वा. Star प्रवाह वर.#SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah pic.twitter.com/nJFjN89Ksr

— [email protected] (@KothareVision) September 10, 2022

Marathi TV serial Sukh Mhanaje Nakki Asta new twist
Star Pravah Entertainment


Previous Post

मोदी सरकारचे मोठे गिफ्ट: या १२ जातींचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये

Next Post

कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आता कालबद्ध कार्यक्रम; आदिवासी विकास मंत्र्यांची घोषणा

Next Post

कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आता कालबद्ध कार्यक्रम; आदिवासी विकास मंत्र्यांची घोषणा

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयची ही आहे भूमिका

February 7, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता दहावीवर हा सुरू आहे अभ्यास; शिक्षणमंत्री म्हणाले…

February 7, 2023

सिद्धार्थ-कियारा आज अडकणार लग्नबंधनात; दोघांनी इतक्या कोटींना घेतले नवे घर

February 7, 2023

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे स्वप्न होणार पूर्ण; मंगेशकर कुटुंब नाशकात सुरू करणार वृद्धाश्रम

February 7, 2023

उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी असे ट्रोल केले…. अखेर उर्फीने व्हिडिओच केला ट्रोल

February 7, 2023

अभिनेत्री अरुणा इराणी यांनी लग्नाबाबत प्रथमच केला हा मोठा खुलासा

February 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group