India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘मुलगी झाली हो’ मालिकेचे प्रेक्षक संतापले; थेट मालिकाच बंद करण्याची मागणी

India Darpan by India Darpan
August 18, 2022
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका घराघरात रोज न चुकता आवर्जून पहिल्या जातात. त्यातील दृश्यांवर प्रेक्षक चर्चा देखील करत असतात. या मालिकांना जसे प्रेक्षक डोक्यावर उचलून घेतात तसेच त्याचे कथानक भरकटल्यावर प्रेक्षक त्यावर संताप व्यक्त करत तिला ट्रोल देखील करतात, असा अनुभव आहे. असाच काहीसा अनुभव सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या बाबतीत दिसत आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘मुलगी झाली हो’ ही मालिका सुरु झाली. या मालिकेत सुरुवातीला विलास पाटील ही रांगडी भूमिका साकारणारे किरण माने, तर साजिरी हे निरागस मुलीचे पात्र आणि बाकी सर्वांच्याच दर्जेदार अभिनयामुळे काहीच दिवसात या मालिकेने टीआरपीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले. ते अनेक दिवस अबाधित राहिले. मात्र मध्यंतरी वादात सापडलेली ही मालिका आता वेगळ्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. मालिकेतील साजिरी गरोदर आहे. तर साजिरीवर जीवापाड प्रेम करणारा तिचा नवरा शौनक आता तिच्या पोटातील मूल आपलं नाही म्हणत साजिरी आणि सिद्धांतवर आरोप करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

काही दिवसांपूर्वी याच वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत देखील असेच कथानक दाखवण्यात आले होते. दीपा गरोदर असताना कार्तिक तिच्यावर आरोप करत डीएनए चाचणीची मागणी करतो. त्यानंतर रुग्णालयात दोन मुलींना जन्म दिल्यानंतर एका मुलीला सौंदर्या इनामदार आपल्याकडे ठेवतात तर दुसऱ्या मुलीला घेऊन दीपा तिला कठीण परिस्थिती वाढवते. ‘मुलगी झाली हो’ मालिका देखील अशाच ट्रॅकवर असल्याने प्रेक्षक संतापले आहेत.

एकाच वाहिनीवरील दोन वेगवेगळ्या मालिकेतील कथानक सारखे कसे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आता इकडे रंग माझा वेगळा खेळता का ? दीपाच्या जागेवर आता साजिरी का ? सगळ्या फिरून एकाच ठिकाणी असे म्हणत प्रेक्षकांनी या मालिकेला ट्रोल केले आहे. सुरवातीला टीआरपीच्या रांगेत मान मिळवणाऱ्या या मालिकेचा चुकलेला ट्रॅक आता तिला कुठल्या दिशेला नेतो आणि प्रेक्षकांचा किती अंत पाहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Marathi TV Serial Mulgi Zali Ho Troll in Social Media
Entertainment Star Pravah


Previous Post

भंडाऱ्यात पुराचा हाहाकार… ४२ निवारागृह… ३३१३ पूरग्रस्तांचे स्थलांतर… २ बळी… गावे आणि रस्ते पाण्यात….

Next Post

स्टेट बँक काढणार नवी कंपनी; कर्मचाऱ्यांचे काय होणार? ग्राहकांवर काय परिणाम?

Next Post
संग्रहित फोटो

स्टेट बँक काढणार नवी कंपनी; कर्मचाऱ्यांचे काय होणार? ग्राहकांवर काय परिणाम?

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group